Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 1

95 Mantra
19/1
Devata- सोमो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृतच्छक्वरी Swara- धैवतः
Mantra with Swara
स्वा॒द्वीं त्वा॑ स्वा॒दुना॑ ती॒व्रां ती॒व्रेणा॒मृता॑म॒मृते॑न। मधु॑मतीं॒ मधु॑मता सृ॒जामि॒ सꣳसोमे॑न॒। सोमो॑ऽस्य॒श्विभ्यां॑ पच्यस्व॒ सर॑स्वत्यै पच्य॒स्वेन्द्रा॑य सु॒त्राम्णे॑ पच्यस्व॥१॥

स्वा॒द्वीम्। त्वा॒। स्वा॒दुना॑। ती॒व्राम्। ती॒व्रेण॑। अ॒मृता॑म्। अ॒मृते॑न। मधु॑मती॒मिति॒ मधु॑ऽमतीम्। मधु॑म॒तेति॒ मधु॑ऽमता। सृ॒जा॒मि॒। सम्। सोमे॑न। सोमः॑। अ॒सि॒। अ॒श्विभ्या॒मित्य॒श्विऽभ्या॑म्। प॒च्य॒स्व॒। सर॑स्वत्यै। प॒च्य॒स्व॒। इन्द्रा॑य। सु॒त्राम्ण॒ इति॑ सु॒ऽत्राम्णे॑। प॒च्य॒स्व॒ ॥१ ॥

Mantra without Swara
स्वाद्वीन्त्वा स्वादुना तीव्रान्तीव्रेणामृताममृतेन । मधुमतीम्मधुमता सृजामि सँ सोमेन । सोमोसिऽअश्विभ्याम्पच्यस्व सरस्वत्यै पच्यस्वेन्द्राय सुत्राम्णे पच्यस्व ॥

स्वाद्वीम्। त्वा। स्वादुना। तीव्राम्। तीव्रेण। अमृताम्। अमृतेन। मधुमतीमिति मधुऽमतीम्। मधुमतेति मधुऽमता। सृजामि। सम्। सोमेन। सोमः। असि। अश्विभ्यामित्यश्विऽभ्याम्। पच्यस्व। सरस्वत्यै। पच्यस्व। इन्द्राय। सुत्राम्ण इति सुऽत्राम्णे। पच्यस्व॥१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे वैद्यराज, तुम्ही (सोमः) सोमाप्रमाणे ऐश्वर्यवान (असि) आहात. अशा (त्वा) तुम्हाला मी (औषधीतज्ञ वा परमेश्वर) औषध-विज्ञानाविषयी (सं.सृजामि) चांगल्या प्रकारे ज्ञान देत आहे. ज्याप्रमाणे मी (स्वादुना) मधुररसयुक्त औषधीनां (स्वाद्वीम्‌) स्वादयुक्त केले आहे (औषधी मधुर असल्यास रोगी ते औषध सहजपणे घेतो) तसेच मी (तीव्रेण) शीघ्र प्रभावकारी तीक्ष्ण (तिखट) गुणधर्म असलेल्या औषधीला (तीव्राम्‌) तीव्र गुण देणारी केले आहे, (अमृतेन) सर्वरोगविनाशक गुणांनी युक्त अशा औषधीनां (अमृताम्‌) अमरत्व वा रोगनाशक गुणधर्म दिले आहेत, तसेच मी ज्याप्रमाणे (मधुमता) स्वादिष्ट (सोमेन) सोमलता आदीद्वारा (मधुमतीम्‌) विशेष मधुर गुणवती करून उपयुक्त औषधी तयार केल्या आहेत, त्याप्रमाणे तुम्ही ह्या औषधी (अश्विभ्याम्‌) विद्वान-स्त्री-पुरुषांना (पच्यस्व) द्या अथवा तुम्हीही सेवन करा. तुम्ही हे औषध (सरस्वत्यै) उत्तम सुसंस्कृत वाणी बोलणाऱ्या स्त्रीप्रमाणे (पच्यस्व) शिजवा अथवा पक्व करा. तसेच तुम्ही हे औषध (सुत्राम्णे) सर्वांना दुःखापासून वाचविणाऱ्या (इन्द्राय) ऐश्वर्यशाली व्यक्तीसाठीही (पच्यस्व) शिजवा (वैद्याने उत्तम प्रकारे निर्मित औषधी विद्यावान स्त्री, पुरुषांना, सुसंस्कृत जनांना आणि श्रीमंतांना देखील द्याव्यात रोगी आणि निर्धनजनांना तर अवश्य द्याव्यात) ॥1॥
Essence
हा मंत्र वैद्यराजाला उद्देशून म्हटला आहे. औषधी सिद्ध करणारा वा निर्मिती करणारा कोणी तज्ञ रसायन शास्त्री वैद्यराजास सांगत आहे/अथवा परमेश्वर वैद्याला आदेश देत आहे, असा संदर्भही या प्रसंगी उचित वाटतो. ^भावार्थ - मनुष्यांनी (रसायन-औषधी तयार करणाऱ्यांनी) वैद्यकशास्त्रात लिहिल्याप्रमाणे प्रशंसनीय, स्वादिष्ट आणि अत्युत्तम औषधींची निर्मिती केली पाहिजे. कारण त्यामुळे सर्वजण रोगमुक्त होऊन नीरोग होतील आणि त्यानंतर ते धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी सतत प्रयत्नशील राहतील. (लोकांनी देखील औषधीसेवन करून नीरोग राहावे आणि धर्मार्थकामोक्ष या चार पुरुषार्थांची सिद्धी करावी) ॥1॥
Subject
आता एकोणीसाव्या अध्यायाचा आरंभ होत आहे. या अध्यायाच्या प्रथम मंत्रात हे सांगितले आहे की मनुष्यांनी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष (चार पुरुषार्थ) यांच्या प्राप्तीसाठी काय केले पाहिजे.॥