Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 77

77 Mantra
18/77
Devata- विश्वेदेवा देवताः Rishi- उशना ऋषिः Chhand- निचृद गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
त्वं य॑विष्ठ दा॒शुषो॒ नॄँः पा॑हि शृणु॒धी गिरः॑। रक्षा॑ तो॒कमु॒त त्मना॑॥७७॥

त्वम्। य॒वि॒ष्ठ॒। दा॒शुषः॑। नॄन्। पा॒हि॒। शृ॒णु॒धि। गिरः॑। रक्ष॑। तो॒कम्। उ॒त। त्मना॑ ॥७७ ॥

Mantra without Swara
त्वँयविष्ठ दाशुषो नऋृँ पाहि शृणुधी गिरः । रक्षा तोकमुत त्मना ॥

त्वम्। यविष्ठ। दाशुषः। नॄन्। पाहि। शृणुधि। गिरः। रक्ष। तोकम्। उत। त्मना॥७७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (यविष्ठ) पूर्ण युवा अशा हे राजा (त्वम्) तू (दाशुष:) विद्वा देणार्‍या (नृन्) मनुष्यांची (षाहि) रक्षा कर आणि त्या विद्वानांच्या (गिर:) विद्या, नीती, विज्ञान आदीनी युक्त अशा वचनांचे (त्यांच्या मंत्रणेचे, मार्गदर्शनाचे) (शृणुधि) श्रवण कर (त्यांचे म्हणणे ऐक) जे वीर सैनिक युद्धात कामीं येतील, त्यांच्या (तोकम्) लहान-लहान बालकांचे (उत) आणखी त्यांच्या पत्नी आदी परिवार जनांचे (त्मना) पूर्ण मनाने, सावध राहून (रक्ष) रक्षण कर व पालन कर ॥77॥
Essence
भावार्थ - राजसभेचे जे सदस्य आणि सैन्याचे जे अधिकारी असतात, त्यांनी दोन आवश्यक कर्में अवश्य करावीत- एक-राज्यातील विद्वज्जनांचे रक्षण-पालन आणि त्यांच्या उपदेशांचे श्रवण-दुसरे कर्तव्य कर्म हे की युद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या पाल्यांचे, पत्नी आदींचे पालन केले पाहिजे. असे आचरण करणार्‍या राजाधिकारी वा सभापुरुषांचा सदैव विजय होत असतो आणि त्याच्या सुखात वृद्धी होत जाते ॥77॥
Subject
पुढील मंत्रात सभापती व सेनापती यांच्या कर्तव्याविषयी -
Footnote
या अठराव्या अध्यायात गणितविद्या, राजा-प्रजा, अध्ययन-अध्यापन करणारे लोक यांच्याविषयी वर्णन केले आहे. या अध्यायात जे जे विषय सांगितले आहेत, त्यांची संगती पूर्वीच्या सतराव्या अध्यायाशी आहे, असे जाणावे. ^यजुर्वेदाच्या अठरावा अध्याय समाप्त