Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 74

77 Mantra
18/74
Devata- अग्निर्देवता Rishi- भरद्वाज ऋषिः Chhand- निचृत त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अ॒श्याम॒ तं काम॑मग्ने॒ तवो॒तीऽअ॒श्याम॑ र॒यिꣳ र॑यिवः सु॒वीर॑म्। अ॒श्याम॒ वाज॑म॒भि वा॒ज॑यन्तो॒ऽश्याम॑ द्यु॒म्नम॑जरा॒जरं॑ ते॥७४॥

अ॒श्याम॑। तम्। काम॑म्। अ॒ग्ने॒। तव॑। ऊ॒ती। अ॒श्याम॑। र॒यिम्। र॒यि॒व॒ इति॑ रयिऽवः। सु॒वीर॒मिति॑ सु॒ऽवी॑रम्। अ॒श्याम॑। वाज॑म्। अ॒भि। वा॒जय॑न्तः। अ॒श्याम॑। द्यु॒म्न॑म्। अ॒ज॒र॒। अ॒जर॑म्। ते॒ ॥७४ ॥

Mantra without Swara
अश्याम तेङ्काममग्ने तवोतीऽअश्याम रयिँ रयिवः सुवीरम् । अश्याम वाजमभि वाजयन्तो श्याम द्युम्नमजराजरन्ते ॥

अश्याम। तम्। कामम्। अग्ने। तव। ऊती। अश्याम। रयिम्। रयिव इति रयिऽवः। सुवीरमिति सुऽवीरम्। अश्याम। वाजम्। अभि। वाजयन्तः। अश्याम। द्युम्नम्। अजर। अजरम्। ते॥७४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) युद्धविद्यानिपुण सेनापती, आम्हा प्रजाजनांनी (तव) आपल्या (ऊती) रक्षण, पालन आदी कार्यांमुळे (तम्) आम्ही जी जी कामना करतो त्या त्या (कायम्) इच्छेला (अश्याम) आम्ही प्राप्त करावे (तुमच्या रक्षण संरक्षणामुळेच आम्ही आपले इच्छित कार्य सिद्ध करू शकतो) (रयिव:) प्रभूत धन संपदेमुळे समृद्ध अशा हे सेनापते, ज्या पद्धतीने आम्ही (सुवीरम्) उत्तम वीर प्राप्त करून घेता येते (रविम्) त्या घनाला (अश्याम) आम्ही प्राप्त करावे (धनाद्वारे उत्तम सैनिक, संरक्षकादी आम्ही नेमावेत) (वाजयन्त:) आम्ही स्वत: युद्ध करीत (युद्धामधे सैनिकांना सहाय्य देत) तसेच त्यांच्याद्वारे युद्ध करावीत (वाजम्) शत्रूविरुद्ध सुरु केलेल्या युद्धात विजय (अभ्यश्यम्) उत्तम रीतीने प्राप्त करावा. हे (अजर) वार्धक्यापासून दूर असलेल्या (तरूण अशा) सेनापती, आम्ही (ते) आपल्या प्रताप-पराक्रमामुळे (अजरम्) अक्षय अशा (रथिम्) धनाचे व कीर्तीचे स्वामी (अश्याम) व्हावेत, (अशाप्रकारे आपण आम्हा प्रजाजनांचे रक्षण करा) ॥74॥
Essence
भावार्थ - प्रजाजनांसाठी उचित आहे की त्यांनी राजपुरुषांच्या संरक्षणात असावे आणि राजपुरुषांनीदेखील, (राष्ट्ररक्षा, संरक्षण आदी कार्यात) प्रजाजनांचे सहकार्य द्यावे. अशाप्रकारे एकमेकाचे सहाय्य करीत (राष्ट्ररक्षणासाठी) सर्व इष्ट कार्ये पूर्ण करावीत. ॥74॥
Subject
पुढील मंत्रात प्रजाजनांनी आणि राजपुरुषांनी काय काय केले पाहिजे, याविषयी -