Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 72

77 Mantra
18/72
Devata- अग्निर्देवता Rishi- विश्वामित्र ऋषिः Chhand- आर्षी गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
वै॒श्वा॒न॒रो न॑ऽऊ॒तय॒ऽआ प्र या॑तु परा॒वतः॑। अ॒ग्निर्नः॑ सुष्टु॒तीरुप॑॥७२॥

वै॒श्वा॒न॒रः। नः॒। ऊ॒तये॑। आ। प्र। या॒तु॒। प॒रा॒वत॒ इति॑ परा॒ऽवतः॑। अ॒ग्निः। नः॒। सु॒ष्टु॒तीः। सु॒स्तु॒तीरिति॑ सुऽस्तु॒तीः। उप॑ ॥७२ ॥

Mantra without Swara
वैश्वानरो नऽऊतय आ प्र यातु परावतः । अग्निर्नः सुष्टुतीरुप ॥

वैश्वानरः। नः। ऊतये। आ। प्र। यातु। परावत इति पराऽवतः। अग्निः। नः। सुष्टुतीः। सुस्तुतीरिति सुऽस्तुतीः। उप॥७२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे सेनापती वा सभाध्यक्ष, ज्याप्रमाणे (वैश्वानर:) समस्त मनुष्यांमधे व्याप्त आणि रक्षक (अग्नि:) सूर्याचा तेज वा सूर्यरूप अग्नी (परावत:) दूरदेशस्थ सर्व पदार्थापर्यंत जातो (सर्वात व्यापत आहे) तद्वत आपण (अतये) आम्हा प्रजाजनांच्या रक्षणाकरिता (न:) आमच्याजवळ (आ, प्र, यात) अवश्य या. तसेच जसे ही विद्युत सर्वात व्यापक असल्यामुळे सर्वांच्या नेहमी जवळ असते, तद्वत आपण (वा आपण आमच्या रक्षणासाठी नियुक्त केलेले सैन्य वा सैनिक) सदा आमच्याजवळ असावेत आणि (न:) आमची (सुष्टुती:) चांगली स्तुतिवचनें आपण (उप) ऐका (आम्ही प्रजाजनांनी रक्षणासाठी हाक मारल्याबरोबर आपले सैनिक त्वरित यावेत, अशी व्यवस्था आपण करा, ही प्रार्थना) ॥72॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जो माणूस दूर असूनही दूर लोकांना आपल्या न्यायपूर्ण कार्यांनी प्रसन्न करतो, तो सूर्याप्रमाणे सर्वांना समान रुपेण न्याय देतो. तसेच जसे कोणीही सत्पुरुष आपल्या सदाचरणामुळे समाजात प्रतिष्ठित वा प्रशंसित होतो, राजपुरुषांनी देखील त्या व्यक्तीप्रमाणे व्हायला पाहिजे. (जनतेशी न्यायाने आणि योग्य रीतीने वागले पाहिजे) ॥72॥
Subject
पुन्हा तोच विषय