Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 68

77 Mantra
18/68
Devata- इन्द्रो देवता Rishi- इन्द्र ऋषिः Chhand- निचृद गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
वार्त्र॑हत्याय॒ शव॑से पृतना॒षाह्या॑य च। इन्द्र॒ त्वाव॑र्तयामसि॥६८॥

वार्त्र॑हत्या॒येति॒ वार्त्र॑ऽहत्याय। शव॑से। पृ॒त॒ना॒षाह्या॑य। पृ॒त॒ना॒सह्या॒येति॑ पृतना॒ऽसह्या॑य। च॒। इन्द्र॑। त्वा॒। आ। व॒र्त॒या॒म॒सि॒ ॥६८ ॥

Mantra without Swara
वार्त्रहत्याय शवसे पृतनाषाह्याय च । इन्द्र त्वा वर्तयामसि ॥

वार्त्रहत्यायेति वार्त्रऽहत्याय। शवसे। पृतनाषाह्याय। पृतनासह्यायेति पृतनाऽसह्याय। च। इन्द्र। त्वा। आ। वर्तयामसि॥६८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - प्रजाजन सेनाध्यक्षाला संबोधून म्हणत आहे - हे (इन्द्र) परमऐश्वर्यशाली सेनाध्यक्ष, आपण (वार्त्रहत्याय) आपल्या विरोधी गुप्त शत्रूंचे तसेच समदास्थित विद्यमान शत्रूंचे विनाशक आहात (रावसे) आपल्याला अधिक बळ मिळावे, आपण अधिकाधिक शक्तीमान व्हावे, यासाठी आम्ही प्रजाजन (पृतनासाह्याय) शत्रुसैन्याच्या तीव्र आक्रमणाचा समर्थपणे सामना करणार्‍या (त्वा) आपणाला (आ, वर्तयामसि) सर्वदृष्ट्या यथोचित सहकार्य करू. आपणही त्याप्रमाणे आमच्याशी अनुकूल वर्तन करा ॥68॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा सूर्य जसा मेघमंडलाचा विध्वंस करतो, तद्वत जो विद्यावान सेनापती शत्रूंचा पराभव करतो आणि आपल्या सैन्यातील शूरवीर सैनिकांचा योग्य पुरस्कार, पदवी, वा पदवी देऊन सत्कार करतो, तो युद्धात अवश्य विजयी होतो ॥68॥
Subject
सेनाध्यक्षाने कशाप्रकारे विजय प्राप्त करावा, याविषयी -