Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 67

77 Mantra
18/67
Devata- अग्निर्देवता Rishi- देवश्रवदेववातावृषी Chhand- आर्षी जगती Swara- निषादः
Mantra with Swara
ऋचो॒ नामा॑स्मि॒ यजू॑षि॒ नामा॑स्मि॒ सामा॑नि॒ नामा॑स्मि। येऽअ॒ग्नयः॒ पाञ्च॑जन्याऽअ॒स्यां पृ॑थि॒व्यामधि॑। तेषा॑मसि॒ त्वमु॑त्त॒मः प्र नो॑ जी॒वात॑वे सुव॥६७॥

ऋचः॑। नाम॑। अ॒स्मि॒। यजू॑षि। नाम॑। अ॒स्मि॒। सामा॑नि। नाम॑। अ॒स्मि॒। ये॒। अ॒ग्नयः॑। पाञ्च॑जन्या॒ इति॒ पाञ्च॑जन्याः। अ॒स्याम्। पृ॒थि॒व्याम्। अधि॑। तेषा॑म्। अ॒सि॒। त्वम्। उ॒त्त॒म इत्यु॑त्ऽत॒मः। प्र। नः॒। जी॒वात॑वे। सु॒व॒ ॥६७ ॥

Mantra without Swara
ऋचो नामास्मि यजूँषि नामास्मि सामानि नामास्मि । येऽअग्नयः प्राञ्चजन्या अस्याम्पृथिव्यामधि । तेषामसि त्वमुत्तमः प्र नो जीवतवे सुव ॥

ऋचः। नाम। अस्मि। यजूषि। नाम। अस्मि। सामानि। नाम। अस्मि। ये। अग्नयः। पाञ्चजन्या इति पाञ्चजन्याः। अस्याम्। पृथिव्याम्। अधि। तेषाम्। असि। त्वम्। उत्तम इत्युत्ऽतमः। प्र। नः। जीवातवे। सुव॥६७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - एका यज्ञवेत्ता विद्वानाला वेदज्ञ विद्वान सांगत आहे - हे याज्ञिक विद्वान, मी (ऋच:) ऋग्वेदाच्या ऋषांची (नाम) व्याख्या सांगणारा (अस्मि) आहे. मी (यजूंषि) यजुर्वेदाचा (नाम) व्याख्यान करणारा वा ज्ञाता (अस्मि) आहे. आणि मी तिसरा ???? विद्वान (सामानि) सामवेदाच्या मंत्रगान पद्धतीचा (नाम) प्रकाश करणारा वा शिकविणारा (अस्मि) आहे. हे याज्ञिक, तू आम्हा तीन वेदांच्या ज्ञाता विद्वानांकडून वेदविद्येचे ग्रहण कर (अशाप्रकारे तू देखील आमचे बरेच हित करू शकतोस) म्हणून तू (अस्याम्) या (पृथिव्याम्) पृथ्वीमधे (ये) जे (पाञ्चजन्या:) मनुष्यहितकारी असे जे जे (अग्नेय:) विविध अग्नी (विद्युत, यज्ञाग्नी, भूगर्भ वा सागरातील अग्नी) जे (अधि) सर्वोपरी वा सर्वश्रेष्ठ आहेत (तेषाम्) त्या अग्नीमधे (त्वम्) तू (उत्तम:) उत्तम अग्नी (असि) विषयी जाणणारा (असि) आहेस. म्हणून तू (न:) आमच्या (जीवातवे) जीवनात आम्हाला सत्कर्म करण्यासाठी (प्र सुव) प्रेरित करू (याज्ञिक विद्वान आणि वेदज्ञ वा वेदपाठी विद्वान, या दोघांनी दोघांसाठी हितकारी जे जे असेल, ते करावे. एकमेकास सहकार्य द्यावे.) ॥67॥
Essence
भावार्थ - जे लोक ऋग्वेदाचे अध्ययन करीत होते वा करीत आहेत, त्याना ऋग्वेदी म्हणतात. तसेच जे यजुर्वेदाचे अध्ययन करतात, त्यांना ‘यजुर्वेदी’ आणि सामवेदाध्यायीला सामवेदी म्हणत असत वा म्हणतात. तसेच अथर्ववेदाचे अध्ययन करणारा ‘अथर्ववेदी’ म्हटला जातो. जे लोक दोन वेद वाचत असत, त्याना ‘द्विवेदी, तीन वेद वाचणार्‍याला त्रिवेदी आणि चाही वेद वाचणार्‍याला ‘चतुर्वेदी’ म्हणतात. जे लोक कोणत्याच वेदाचे अध्ययन करीत नाहीत, त्यांना कोणतेच नाव नाही. याशिवाय जे लोक अग्निहोत्र आदी यज्ञाद्वारे सर्व मनुष्यांचे हित करतात, त्याच्या या कार्यामुळे त्यांची कीर्ती होते आणि परिणामी सर्व प्राण्यांना दीर्घायुष्य लाभते. ॥67॥
Subject
आता पुढील मंत्रात ऋग्वेद आदीचे अध्ययन करून काय करावे ?