Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 66

77 Mantra
18/66
Devata- अग्निर्देवता Rishi- देवश्रवदेववातावृषी Chhand- निचृत त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अ॒ग्निर॑स्मि॒ जन्म॑ना जा॒तवे॑दा घृ॒तं मे॒ चक्षु॑र॒मृतं॑ मऽआ॒सन्। अ॒र्कस्त्रि॒धातू॒ रज॑सो वि॒मानोऽज॑स्रो घ॒र्मो ह॒विर॑स्मि॒ नाम॑॥६६॥

अ॒ग्निः। अ॒स्मि॒। जन्म॑ना। जा॒तवे॑दा इति॑ जा॒तऽवे॑दाः। घृ॒तम्। में॒। चक्षुः॑। अ॒मृत॑म्। मे॒। आ॒सन्। अ॒र्कः। त्रि॒धातु॒रिति॑ त्रि॒ऽधातुः॑। रज॑सः। वि॒मान॒ इति॑ वि॒ऽमानः॑। अज॑स्रः। घ॒र्मः। ह॒विः। अ॒स्मि॒। नाम॑ ॥६६ ॥

Mantra without Swara
अग्निरस्मि जन्मना जातवेदा घृतम्मे चक्षुरमृतम्म आसन् । अर्कस्त्रिधातू रजसो विमानो जस्रो घर्मा हविरस्मि नाम ॥

अग्निः। अस्मि। जन्मना। जातवेदा इति जातऽवेदाः। घृतम्। में। चक्षुः। अमृतम्। मे। आसन्। अर्कः। त्रिधातुरिति त्रिऽधातुः। रजसः। विमान इति विऽमानः। अजस्रः। घर्मः। हविः। अस्मि। नाम॥६६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - यज्ञकर्ता आत्मविश्वासाने म्हणत आहे - (जन्मना) (याज्ञिकाच्या घरी माझ्या जन्म झाल्यामुळे) जन्मानेच मी (जातवेदा:) सर्व उत्पन्न पदार्थांत विद्यमान असलेल्या (अग्नि:) अग्नीप्रमाणे (तेजस्वी) (अस्मि) आहे. ज्याप्रमाणे (घृतम्) घृत हे अग्नीश (चक्षु:) प्रकाशक वा दीप्तिकारक आहे, तद्वत (मे) ते घृत माझ्यासाठी ही पुष्टिकारक व्हावे. ज्याप्रमाणे चांगल्याप्रकारे संस्कारित (हवि:) हवनकरण्यास योग्य अशा द्रव्याची यज्ञात आहुती दिली जाते आणि ती (अमृतम्) सर्वरोगनाशक आणि सुखकारक असते, त्याचप्रमाणे ती आहुती (मे) माझ्या (आसन्) मुखाला पुष्टिकारक अन्नाच्या रुपाने प्राप्त व्हावी. (अशी मी कामना करतो) (त्रिधातु:) ज्यामधे सत्व, रज आणि तम हे तीन गुण आहेत, तो यज्ञ (रजस:) लोक लोकान्तरांना (विमान:) विमान यानाप्रमाणे धारण करतो आणि तो (अजस्र:) निरंतर गमनशील तसेच (धर्म:) प्रकाशाप्रमाणे दीप्तिमान आहे. त्या यज्ञामुळे सुगंध उत्पन्न होतो यज्ञ हाच (अर्स:) सत्कार करण्यास योग्य आहे त्या यज्ञाची (नाम) अशी प्रसिद्धी सर्वत्र आहे. ज्याप्रमाणे शुद्ध केलेले आणि हवनात आहुती देण्यास योग्य असे पदार्थ शुद्ध असतात, तसाच मी याज्ञिक देखील (अस्मि) आहे. ॥66॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे अग्नी आहुत सर्व पदार्थांचे वायूमधे प्रसारण करतो आणि त्याद्वारे वातावरणाला सुगंधित करून, रोगनिर्मूलन करून सर्व प्राण्यांना सुखी करतो, तद्वत सर्व मनुष्यांनी देखील करावे. (यज्ञाद्वारे रोगनिवारण, प्रदूषविरहित करावे) ॥66॥
Subject
यज्ञामुळे काय होते, याविषयी -