Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 65

77 Mantra
18/65
Devata- यज्ञो देवता Rishi- विश्वकर्मर्षिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
यत्र॒ धारा॒ऽअन॑पेता॒ मधो॑र्घृ॒तस्य॑ च॒ याः। तद॒ग्निर्वै॑श्वकर्म॒णः स्व॑र्दे॒वेषु॑ नो दधत्॥६५॥

यत्र॑। धाराः॑। अन॑पेता॒ इत्यन॑पऽइताः। मधोः॑। घृ॒तस्य॑। च॒। याः। तत्। अ॒ग्निः। वै॒श्व॒क॒र्म॒ण इति॑ वैश्वऽकर्म॒णः। स्वः॑। दे॒वेषु॑। नः॒। द॒ध॒त् ॥६५ ॥

Mantra without Swara
यत्र धाराऽअनपेता मधोर्घृतस्य च याः । तदग्निर्वैश्वकर्मणः स्वर्देवेषु नो दधत् ॥

यत्र। धाराः। अनपेता इत्यनपऽइताः। मधोः। घृतस्य। च। याः। तत्। अग्निः। वैश्वकर्मण इति वैश्वऽकर्मणः। स्वः। देवेषु। नः। दधत्॥६५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - विद्वज्जन (यज्ञ) ज्या यज्ञामधे (मधो:) मधुर आदी गुणांनी युक्त आणि सुगंधित अशा प्राण्यांच्या (च) आणि (सृतस्य) तुपाच्या (वा:) ज्या (अमपेता:) सम्मिश्रित (धारा:) धारारुपाने आहुती देतात (तत्) त्या मधून द्रव्यांमुळे तसे घृताहुतीमुळे (वैश्वकर्मण:) सर्व कार्यांचा जो निमित्त ते (अग्नि:) अग्नी (न:) आमच्याकरिता (देवेषु) दिव्य कार्यामधे (आम्ही करीत असलेल्या परोपकाराची श्रेष्ठ कार्यामधे) (स्व:) सुख (दधत्) धारण करतो (द्रव्यांच्या आहुतीमुळे अग्नी आमच्या प्रपंच, उद्यम आदी कार्यात सहाय्यकारी होतो. यज्ञाग्नीमुळे वायू शुद्ध होऊन प्राण्यांचे जीवन सुखकर बनते) ॥62॥
Essence
भावार्थ -जे लोक यज्ञवेदीचे निर्माण करून, तिथे यज्ञात सुगंध आणि मिष्ट गुणांनी युक्त पदार्थांसह ‘प्रभूत मात्रेत घृताहुती देतात, ते स्वत:च्या आणि इतरांच्या रोगांचे निवारण करून सर्वांकरिता अतुल सुख उत्पन्न करतात. ॥65॥
Subject
मनुष्यांनी काय केले पाहिजे, याविषयी -