Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 61

77 Mantra
18/61
Devata- प्रजापतिर्देवता Rishi- गालव ऋषिः Chhand- आर्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
उद्बु॑ध्यस्वाग्ने॒ प्रति॑ जागृहि॒ त्वमि॑ष्टापू॒र्ते सꣳसृजेथाम॒यं च॑। अ॒स्मिन्त्स॒धस्थे॒ऽअध्युत्त॑रस्मि॒न् विश्वे॑ देवा॒ यज॑मानश्च सीदत॥६१॥

उत्। बु॒ध्य॒स्व॒। अ॒ग्ने॒। प्रति॑। जा॒गृहि॒। त्वम्। इ॒ष्टा॒पू॒र्त्ते इती॑ष्टाऽपू॒र्त्ते। सम्। सृ॒जे॒था॒म्। अ॒यम्। च॒। अ॒स्मिन्। स॒धस्थ॒ इति॑ स॒धऽस्थे॑। अधि॑। उत्त॑रस्मि॒न्नित्युत्ऽत॑रस्मिन्। विश्वे॑। दे॒वाः॒। यज॑मानः। च॒। सी॒द॒त॒ ॥६१ ॥

Mantra without Swara
उद्बुध्यस्वाग्ने प्रति जागृहि त्वमिष्टापूर्ते सँसृजेथामयं च । अस्मिन्त्सधस्थे अध्युत्तरस्मिन्विस्वे देवा यजमानाश्च सीदत ॥

उत्। बुध्यस्व। अग्ने। प्रति। जागृहि। त्वम्। इष्टापूर्त्ते इतीष्टाऽपूर्त्ते। सम्। सृजेथाम्। अयम्। च। अस्मिन्। सधस्थ इति सधऽस्थे। अधि। उत्तरस्मिन्नित्युत्ऽतरस्मिन्। विश्वे। देवाः। यजमानः। च। सीदत॥६१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (यज्ञारंभ करतेवेळी ऋत्विज् यजमान आणि इतर विद्वानांना संबोधून ब्रह्मा वा पुरोहिताचे वचन) हे (अग्ने) अग्नीप्रमाणे तेजस्वी असलेल्या ऋत्विक् पुरुष, (त्वम्) आपण (उद्बुध्यस्व) उग, प्रबोधित (हुशार) व्हा आणि चैतन्यपणे (प्रति, जागृहि) यजमानाला अविद्यारूप निद्रेतून उठवा, (त्याच्या अंगी असलेल्या आळस्य दूर करून त्याला विद्याग्रहणासाठी तत्पर करा) (च) आणि (अयम्) या ब्रह्मविद्येचा उपदेश करणारा यजमान व तुम्ही, असे दोघे (इष्टापूर्त्ते) यज्ञ संपन्न करण्यासाठी आवश्यक साधन-सामग्री (संसृजेथाम्) तयार करा (विश्वे) (देवा:) हे समस्थ विद्वज्जनहो, (च) आणि हे (खजनाम:) विद्यादाता व यज्ञकर्ता यजमान आपण सर्वजण (अस्मिन्) या (सधस्थे) एका ठिकाणी या आणि (उत्तरस्मिन्) उत्तम आसनावर (अधि, सदित) बसा ॥61॥
Essence
भावार्थ - जे चैतन्यमय (उत्साही) आणि बुद्धिमान विद्यार्थी असतील, त्यांनी अध्ययन करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे शिकविले पाहिजे. त्यापैकी जे अधिक विद्या शिकण्यासाठी उत्सुक असतील व सांगितल्याप्रमाणे आचरण करणारे असतील, त्यांना विशेष अनुकूलतेने शिकवीत व एकमेकाविषयी प्रीतीभाव ठेऊन विविध विद्यांमधे प्रगती करावी. या अध्ययन करणार्‍या व अध्यापन करणार्‍या विद्यार्थ्यां पेक्षा वेगळे जे इतर उत्तम विद्वान असतील, त्यानी त्या विद्यार्थ्यांची नेहमी परीक्षा घेतली पाहिजे की ज्यायोगे ते अध्यापक आणि विद्यार्थी विविध विद्यांमधे प्रगती करण्यासाठी निरंतर यत्नशील राहतील. त्याप्रमाणे ऋत्विज्, यजमान आणि सभ्य परीक्षक विद्यानांनी यज्ञविषयीही प्रगती केली पाहिजे ॥61॥
Subject
पुढील मंत्रातही तोच विषय -