Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 54

77 Mantra
18/54
Devata- इन्दु र्देवता Rishi- गालव ऋषिः Chhand- भुरिगार्ष्युष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
दि॒वो मू॒र्द्धासि॑ पृथि॒व्या नाभि॒रूर्ग॒पामोष॑धीनाम्। वि॒श्वायुः॒ शर्म॑ स॒प्रथा॒ नम॑स्प॒थे॥५४॥

दि॒वः। मू॒र्द्धा। अ॒सि॒। पृ॒थि॒व्याः। नाभिः॑। ऊर्क्। अ॒पाम्। ओष॑धीनाम्। वि॒श्वायु॒रिति॑ वि॒श्वऽआ॑युः। शर्म॑। स॒प्रथा॒ इति॑ स॒ऽप्रथाः॑। नमः॑। प॒थे ॥५४ ॥

Mantra without Swara
दिवो मूर्धासि पृथिव्या नाभिरूर्गपामोषधीनाम् । विश्वायुः शर्म सप्रथा नमस्पथे ॥

दिवः। मूर्द्धा। असि। पृथिव्याः। नाभिः। ऊर्क्। अपाम्। ओषधीनाम्। विश्वायुरिति विश्वऽआयुः। शर्म। सप्रथा इति सऽप्रथाः। नमः। पथे॥५४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रजाजन आपल्या राजाला वा विद्वानाला उद्देशून) हे विद्वान (राजा सभापती), आपण (दिव:) प्रकाशाच्या अर्थात प्रतापाचे (मूर्द्धा) शिराप्रमाणे (प्रतापीजनांमधे सर्वोच्च) आहात. आपण (पृथिव्या:) शरीरामधे नाभीच्या बंधनाप्रमाणे आहात (नाभी शरीरातील नस-नाड्यांचे केंद्रस्थानी आहे, तद्वत् राष्ट्राचे सर्व नियंत्रण आपल्या हातात आहे) आपण (अपाम्) जलाच्या आणि (ओषधीनाम्) औषधींच्या (उर्क) रसाप्रमाणे आहात (राष्ट्राच्या प्रगतीचे सर्व सूत्र आपण जाणता) आपण (विश्वायु:) शंभर वर्षाचे पूर्ण आयुष्य भोगणारे असून (सप्रथा:) कीर्तीमान (असि) आहात. (आमची प्रार्थना की) आपण (पथे) सदैव सन्मार्गावर अग्रेसर राहण्यासाठी (नम:) अन्न-धान्य (शर्म) आणि सुख-समाधान प्राप्त करा (आपणास सदैव सुखे मिळो) ॥54॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जो माणूस न्यायी, सहनशील, औषधी सेवन करणारा, यथोचित आहार-विहार करणारा असून इंद्रिय संयमी असतो, तो आवश्य शंभर वर्ष सुखी आयुष्य भोगतो. ॥54॥
Subject
कोण वा कशा प्रकारचा माणूस दीर्घजीवी होतो, याविषयी -