Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 52

77 Mantra
18/52
Devata- अग्निर्देवता Rishi- शुनःशेप ऋषिः Chhand- विराडार्षी जगती Swara- निषादः
Mantra with Swara
इ॒मौ ते॑ प॒क्षाव॒जरौ॑ पत॒त्त्रिणौ॒ याभ्या॒ रक्षा॑स्यप॒हस्य॑ग्ने। ताभ्यां॑ पतेम सु॒कृता॑मु लो॒कं यत्र॒ऽऋष॑यो ज॒ग्मुः प्र॑थम॒जाः पु॑रा॒णाः॥५२॥

इ॒मौ। ते॒। प॒क्षौ। अ॒जरौ॑। प॒त॒त्रिणौ॑। याभ्या॑म्। रक्षा॑सि। अ॒प॒हꣳसीत्य॑प॒ऽहꣳसि॑। अ॒ग्ने॒। ताभ्या॑म्। प॒ते॒म॒। सु॒कृता॒मिति॑ सु॒ऽकृता॑म्। ऊ॒ऽइत्यँू॑। लो॒कम्। यत्र॑। ऋष॑यः। ज॒ग्मुः। प्र॒थ॒म॒जा इति॑ प्रथम॒ऽजाः। पु॒रा॒णाः ॥५२ ॥

Mantra without Swara
इमौ ते पक्षावजरौ पतत्रिणौ याभ्याँ रक्षाँस्यपहँस्यग्ने । ताभ्याम्पतेम सुकृतामु लोकँयत्रऽऋषयो जग्मुः प्रथमजाः पुराणाः ॥

इमौ। ते। पक्षौ। अजरौ। पतत्रिणौ। याभ्याम्। रक्षासि। अपहꣳसीत्यपऽहꣳसि। अग्ने। ताभ्याम्। पतेम। सुकृतामिति सुऽकृताम्। ऊऽइत्यँू। लोकम्। यत्र। ऋषयः। जग्मुः। प्रथमजा इति प्रथमऽजाः। पुराणाः॥५२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (अग्ने) अग्नीप्रमाणे प्रतापी असलेले हे विद्वान, (ते) आपले (इमो) हे जे (पतत्रिणौ) उच्च स्तरातील (सर्वोच्च वा अत्युत्तम) तसेच (अजरौ) कधी नष्ट न होणारे, अजर अमर असे (पक्षौ) कार्य कारण रुपाते (अविनाशी) असलेले पदार्थ आपल्याजवळ आहेत की ज्याद्वारे आपण (रक्षांसि) दुष्ट प्राण्यांना वा दोषादीनां (अपहंसि) दूर सारता (ताभ्याम्) त्या (उ) साधनांच्या साहाय्याने आम्ही देखील (सुकृतास्) सुकृती सज्जन अनुभवीत असलेल्या (लोकम्) आनंदापर्यंत (पतेम) पोहचवावे (असे आम्हाला वाटते) (यत्र ज्या आनंदापर्यंत (प्रथमजा:) सर्वव्यापी परमेश्वरा उपासनेमुळे अथवा अतिमहत्त्वाच्या वेदांचे अध्ययन केल्यामुळे प्रख्यात झालेले विद्वान तसेच (पुराणा:) पूर्वी होऊन गेलेले (ऋणाय:) वेदार्थ ज्ञाता विद्वान ऋषीगण ज्याठिकाणी (ज्या उच्चस्थानावर) (जग्मु:) पोहचले (आम्ही देखील त्याठिकाणी जाऊ वा जाण्याचा प्रयत्न करू ॥51॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकालुप्तोपमा अलंकार आहे. शास्त्रवेता विद्वान दोषांचा त्याग आणि सद्गुणांचे ग्रहण करून, ब्रह्मप्राप्ती करून आनंदित होतात, इतर लोकांनी त्यांना प्राप्त करून (त्यांच्या सहवासात राहून) सुखी आनंदी व्हायला हवे. ॥51॥
Subject
पुनश्च तोच विषय -