Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 49

77 Mantra
18/49
Devata- बृहस्पतिर्देवता Rishi- शुनःशेप ऋषिः Chhand- निचृच्छक्वरी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
तत्त्वा॑ यामि॒ ब्रह्म॑णा॒ वन्द॑मान॒स्तदा शा॑स्ते॒ यज॑मानो ह॒विर्भिः॑। अहे॑डमानो वरुणे॒ह बो॒ध्युरु॑शꣳस॒ मा न॒ऽआयुः॒ प्रमो॑षीः॥४९॥

तत्। त्वा॒। या॒मि। ब्रह्म॑णा। वन्द॑मानः। तत्। आ। शा॒स्ते॒। यज॑मानः। ह॒विर्भि॒रिति ह॒विःऽभिः॑। अहे॑डमानः। व॒रु॒ण॒। इ॒ह। बो॒धि॒। उरु॑श॒ꣳसेत्युरु॑ऽशꣳस। मा। नः॒। आयुः॑। प्र। मो॒षीः॒ ॥४९ ॥

Mantra without Swara
तत्त्वा यामि ब्रह्मणा वन्दमानस्तदा शास्ते यजमानो हविर्भिः । अहेडमानो वरुणेह बोध्युरुशँस मा न आयुः प्र मोषीः ॥

तत्। त्वा। यामि। ब्रह्मणा। वन्दमानः। तत्। आ। शास्ते। यजमानः। हविर्भिरिति हविःऽभिः। वरुण। इह। बोधि। उरुशꣳसेत्युरुऽशꣳस। मा। नः। आयुः। प्र। मोषीः॥४९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (दीर्घायूची कामना करणारा उपासक विद्वावास म्हणत आहे) (उरूशंस) अनेकांची प्रशंसा करणारे (अथवा अनेकांद्वारा प्रशंसित अशा हे (वरूण) श्रेष्ठ विद्वान, तुम्ही (ब्रह्मणां) वेदांद्वारे (वन्दमान:) स्तुती करीत एक (यजमान:) यज्ञ करणारा यजमान (अहेडमान:) सर्वांतर्फे सत्कार प्राप्त करीत (हविर्भि:) हवनीय उत्तम पदार्थांची आहुती देत जी (आ, शास्ते) आशा करतो (ज्या पदार्थांच्या प्राप्तीची अपेक्षा करतो (तत्) त्या वस्तूनां (यानि) मी उपासकदेखील प्राप्त करीन, असे करा. तसेच (त्वा) तुझ्या सहकार्याने वा सहवासाद्वारे जे (आयु:) दीर्घायुष्य मला मिळेल (तत्) त्या दीर्घायुष्यास तू देखील प्राप्त कर (यज्ञ केल्याने यजमान, मी आणि तू, असे सर्वजण दीर्घायुषी होऊ या) (इह) या जगात दीर्घ जीवनाचे जे महत्त्व आहे, त्यास तू (बोधि) नीट जाणून घे आणि (न:) आमच्या दीर्घायुष्याचे (मा, प्र, मोषी:) हरण करू नकोस (ज्यायोगे आमचे आयुष्य कमी होईल, असे काही करूं नकोस) ॥49॥
Essence
भावार्थ - सत्यवादी आणि शास्त्रवेत्ता विद्वज्जन ज्या स्वरूपाची (वा आत्मिक उन्नतीसाठी ज्या वस्तूंची) कामना करतात (वा करीत असतील) इतर सर्व लोकांनीही त्याच प्रकारची कामना करावी. कोणी कधीही विद्वानांचा अनादर करू नये. तसेच सर्व स्त्रियांनी व पुरुषांनी ब्रह्मचर्य-पालन करीत अयोग्य आहार, विहार, व्यभिचार, अत्यंत विषयासक्ती यांसारखे दुराचार करून आपले दीर्घजीवन नष्ट होईल दुराचार करून आपले दीर्घजीवन नष्ट होईल अशा प्रकारचे दुराचरण कधीही करूं नये. ॥49॥।
Subject
मनुष्यांनी विद्वानांप्रमाणे आपले आचरण असू द्यावे या विषयी -