Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 47

77 Mantra
18/47
Devata- बृहस्पतिर्देवता Rishi- शुनःशेप ऋषिः Chhand- आर्ष्युनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
या वो॑ दे॒वाः सूर्ये॒ रुचो॒ गोष्वश्वे॑षु॒ या रुचः॑। इन्द्रा॑ग्नी॒ ताभिः॒ सर्वा॑भी॒ रुचं॑ नो धत्त बृहस्पते॥४७॥

याः। वः॒। दे॒वाः। सूर्य्ये॑। रुचः॑। गोषु॑। अश्वे॑षु। याः। रुचः॑। इन्द्रा॑ग्नी। ताभिः॑। सर्वा॑भिः। रुच॑म्। नः॒। ध॒त्त॒। बृ॒ह॒स्प॒ते॒ ॥४७ ॥

Mantra without Swara
या वो देवाः सूर्ये रुचो गोष्वश्वेषु या रुचः । इन्द्राग्नी ताभिः सर्वाभी रुचं नो धत्त बृहस्पते ॥

याः। वः। देवाः। सूर्य्ये। रुचः। गोषु। अश्वेषु। याः। रुचः। इन्द्राग्नी। ताभिः। सर्वाभिः। रुचम्। नः। धत्त। बृहस्पते॥४७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (या मंत्राचेही परमेश्वर आणि विद्वान असे दोन पक्ष आहेत) हे (बृहस्पते) महान (विशाल ब्रम्हांडाचे) पदार्थाचे निर्माण वा पालन करणारे हे परमेश्वर आणि (देवा:) हे विद्वज्जन हो, (या:) जो (व:) आपणा सर्वांची (प्रीती) (सूर्ये) चराचर जगतात व्याप्त परमेश्वराविषयी आहे आणि ईश्वराची स्वत: विषयी तसेच तुम्हा विषयी (रुच:) प्रीती आहे, तसेच या (गोषु) या किरणांविषयी स्वत:च्या इंद्रियांविषयी आणि दूध देणार्‍या गायी विषयी तसेच (अश्वेषु) अग्नीविषयी आणि अश्वाविषयी (रुच:) प्रीती आहे, तसेच या सर्वांमधे (इन्द्राग्नी) जी विद्युत आणि जो अग्नी विद्यमान आहे, (ताभि:) (सर्वाभि:) त्या सर्व प्रीतीभावनांसह (न:) आम्हा (उपासकांवर) देखील तुम्ही (परमेश्वर आणि विद्वान) (रुचम्) प्रीतीभाव (धत्त) धारण करा (आमच्या विषयी प्रीती असू द्या) ॥47॥
Essence
भावार्थ -या मंत्रात श्लेष अलंकार आहे. जसे परमेश्वर सर्व लोकांना गौ आदी प्राण्यांची रक्षा करण्याची आणि पदार्थ विद्या (भौतिकशास्त्र) द्वारा आपली उन्नती करण्याची प्रेरणा देतो, तद्वत विद्वनांनी देखील केले पाहिजे ॥47॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय -