Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 43

77 Mantra
18/43
Devata- विश्वकर्मा देवता Rishi- देवा ऋषयः Chhand- विराडार्षी जगती Swara- निषादः
Mantra with Swara
प्र॒जाप॑तिर्वि॒श्वक॑र्मा॒ मनो॑ गन्ध॒र्वस्तस्य॑ऽऋ॒क्सा॒मान्य॑प्स॒रस॒ऽएष्ट॑यो॒ नाम॑। स न॑ऽइ॒दं ब्रह्म॑ क्ष॒त्रं पा॑तु॒ तस्मै॒ स्वाहा॒ वाट् ताभ्यः॒ स्वाहा॑॥४३॥

प्र॒जाप॑ति॒रिति॒ प्र॒जाऽप॑तिः। वि॒श्वक॒र्मेति॑ वि॒श्वऽक॑र्म्मा। मनः॑। ग॒न्ध॒र्वः। तस्य॑। ऋ॒क्सा॒मानीत्यृ॑क्ऽसा॒मानि॑। अ॒प्स॒रसः॑। एष्ट॑य॒ इत्याऽइ॑ष्टयः। नाम॑। सः। नः॒। इ॒दम्। ब्रह्म॑। क्ष॒त्रम्। पा॒तु॒। तस्मै॑। स्वाहा॑। वाट्। ताभ्यः॑। स्वाहा॑ ॥४३ ॥

Mantra without Swara
प्रजापतिर्विश्वकर्मा मनो गन्धर्वस्तस्यऽऋक्सामान्यप्सरसऽएष्टयो नाम । स नऽइदम्ब्रह्म क्षत्रम्पातु तस्मै स्वाहा वाट्ताभ्यः स्वाहा ॥

प्रजापतिरिति प्रजाऽपतिः। विश्वकर्मेति विश्वऽकर्म्मा। मनः। गन्धर्वः। तस्य। ऋक्सामानीत्यृक्ऽसामानि। अप्सरसः। एष्टय इत्याऽइष्टयः। नाम। सः। नः। इदम्। ब्रह्म। क्षत्रम्। पातु। तस्मै। स्वाहा। वाट्। ताभ्यः। स्वाहा॥४३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, जो (विश्वकर्मा) सर्व कर्म करणारा (लोहार, सुतार, सोनार आदी विविध व्यवसाय करणारा) माणूस आहे (आणि जो कर्म करतो अशा प्रकारे आपल्या व्यवसायाने) इतर प्रजाजनांचे पालन करीत असतो (तस्य) त्याचा (गन्धर्व:) उत्तमवाणी आणि (मन:) ज्ञानप्राप्तीचे साधन जे मन (त्यांचे महत्त्व ओळखा) तसेच (ऋक्सामानि) ऋग्वेद व सामवेदाचे मंत्र (अप्सरस:) हृदयाकाशात व्याप्त आपण आदी पदार्थांमध्ये क्रिया करतात (नवोत्साह देतात) तसेच (एष्टय:) विद्वानांची संगती, सत्याचरण आणि विद्यादान, हे सर्व (वाणी, मन, वेदमंत्र, विद्वत्संगती, सत्य आणि विद्या) हे सर्व (नाम) संसारात प्रसिद्ध आहेत. (स:) ते मन वा सत्य ज्याप्रमाणे (न:) आम्हा (सामान्यजनांसाठी) आणि (इदम्) या (ब्रह्म) वेदशास्त्रासाठी तसेच (क्षत्रम्) धनुर्वेदासाठी (पातु) रक्षण करणारे ठरोत, तद्वत (तस्मै) तुम्ही देखील (तस्मै) त्या मन व सत्यसाठी (स्वाहा) सत्यवाणी बोलणारे व्हा (वाट्) धर्माची प्राप्ती करणारे व्हा आणि (ताभ्य:) त्या सर्व पदार्थांसाठी (स्वाहा) खर्‍या अर्थाने सत्याचरण करणारे व्हा आणि स्वत:वर व इतरांवर उपकार करा ॥43॥
Essence
भावार्थ - जे लोक पुरुषार्थी विचारशील आणि वेदविद असतात, तेच जगासाठी भूषणभूत ठरतात. ॥43॥
Subject
मनुष्यांनी कसे असावे, याविषयी -