Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 39

77 Mantra
18/39
Devata- सूर्यो देवता Rishi- देवा ऋषयः Chhand- भुरिगार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
स॒ꣳहि॒तो वि॒श्वसा॑मा॒ सूर्यो॑ गन्ध॒र्वस्तस्य॒ मरी॑चयोऽप्स॒रस॑ऽआ॒युवो॒ नाम॑। स न॑ऽइ॒दं ब्रह्म॑ क्ष॒त्रं पा॑तु॒ तस्मै॒ स्वाहा॒ वाट् ताभ्यः॒ स्वाहा॑॥३९॥

स॒ꣳहि॒त इति॑ सम्ऽहि॒तः। वि॒श्वसा॒मेति॑ वि॒श्वऽसा॑मा। सूर्यः॑। ग॒न्धर्वः॒। तस्य॑। मरी॑चयः। अ॒प्स॒रसः॑। आ॒युवः॑। नाम॑। सः। नः॒। इ॒दम्। ब्रह्म॑। क्ष॒त्रम्। पा॒तु॒। तस्मै॑। स्वाहा॑। वाट्। ताभ्यः॑। स्वाहा॑ ॥३९ ॥

Mantra without Swara
सँहितो विश्वसामा सूर्या गन्धर्वस्तस्य मरीचयो प्सरस आयुवो नाम । स नऽइदम्ब्रह्म क्षत्रम्पातु तस्मै स्वाहा वाट्ताभ्यः स्वाहा ॥

सꣳहित इति सम्ऽहितः। विश्वसामेति विश्वऽसामा। सूर्यः। गन्धर्वः। तस्य। मरीचयः। अप्सरसः। आयुवः। नाम। सः। नः। इदम्। ब्रह्म। क्षत्रम्। पातु। तस्मै। स्वाहा। वाट्। ताभ्यः। स्वाहा॥३९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्यावान राजा, (संहित:) सर्व मूर्त पदार्थाशी संयुक्त असणार्‍या (सूर्य:) सूर्याप्रमाणे आपणही सर्व विद्वानांपर्यंत जाणारे आहात. सूर्य (गन्धर्व:) पृथ्वीला धारण करणारा असून (तस्य) त्याची (मरीचय:) किरणें (अप्सरस:) अंतरिक्षा पर्यंत जातात आणि तेथे त्या (आयुव:) सर्वत: (आकाशस्थ पदार्थांचा, जलाचा) संयोग अथवा वियोग करतात, असे (नाम) प्रसिद्ध आहे. म्हणजे त्या ती सूर्यकिरणे जल आदी पदार्थांचा संयोग वा विभाजन करतात. ताभ्य:) अंतरिक्षात जाणार्‍या-येणार्‍या त्या किरणांपासून, आपण, (विश्वसामा) सामवेदाचे ज्ञाता आपण (स्वाहा) योग्य क्रिया, प्रयोग आदीद्वारा कार्यसिद्धी करावी त्यायोगे त्यांच्या योग्य तो उपयोग होईल. (तस्मै) त्या सूर्यासाठी तुम्ही (स्वाहा) सत्य आणि यथोचित व क्रिया करता (प्रयोगाद्वारे योग्य उपभोग घेत आहात) (स:) असे आपण (न:) आम्हा (सामान्य प्रजाजनांसाठी) आणि (इदम्) या (ब्रह्म) विद्वानांसाठी व (क्षत्रम्) शूरवीरांच्या वेशासाठी (वाट्) आवश्यक कर्म करण्यासाठी (विद्वानांना आणि क्षत्रियांना त्यांची आवश्यक कर्तव्यें करण्यासाठी) आपण (पातु) यांचे रक्षण करा. ॥39॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी सूर्याच्या किरणांचा युक्तिपूर्वक (योग्य त्या पद्धतीने) उपयोग करून आपले ज्ञान व वीरत्वभाव यांची वृद्धी करून आपले प्रयोजन पूर्ण करावेत. ॥39॥
Subject
पुन्हा तोच विषय -