Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 38

77 Mantra
18/38
Devata- ऋतुविद्याविद्विद्वान देवता Rishi- देवा ऋषयः Chhand- विराडार्षी Swara- धैवतः
Mantra with Swara
ऋ॒ता॒षाडृ॒तधा॑मा॒ग्निर्ग॑न्ध॒र्वस्तस्यौष॑धयोऽप्स॒रसो॒ मुदो॒ नाम॑। स न॑ऽइ॒दं ब्रह्म क्ष॒त्रं पा॑तु॒ तस्मै॒ स्वाहा॒ वाट् ताभ्यः॒ स्वाहा॑॥३८॥

ऋ॒ता॒षा॒ट्। ऋ॒तधा॒मेत्यृ॒तऽधा॑मा। अ॒ग्निः। ग॒न्ध॒र्वः। तस्य॑। ओष॑धयः। अ॒प्स॒रसः॑। मुदः॑। नाम॑। सः। नः॒। इ॒दम्। ब्रह्म॑। क्ष॒त्रम्। पा॒तु॒। तस्मै॑। स्वाहा॑। वाट्। ताभ्यः॑। स्वाहा॑ ॥३८ ॥

Mantra without Swara
ऋताषाडृतधामाग्निर्गन्धर्वस्तस्यौषधयोप्सरसो मुदो नाम । स न इदम्ब्रह्म क्षत्रम्पातु तस्मै स्वाहा वाट्ताभ्यः स्वाहा ॥

ऋताषाट्। ऋतधामेत्यृतऽधामा। अग्निः। गन्धर्वः। तस्य। ओषधयः। अप्सरसः। मुदः। नाम। सः। नः। इदम्। ब्रह्म। क्षत्रम्। पातु। तस्मै। स्वाहा। वाट्। ताभ्यः। स्वाहा॥३८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, (राजा असा असावा की) जो (ऋताषाट्) सत्याचरण करणारा व सत्याचरण पाहून प्रसन्न होणार आहे, (ऋतधाम्प) ज्याच्या राहण्याचे निश्चित उत्तम स्थान आहे, जो (गन्धर्व:) पृथ्वीला (आपल्या राज्याला) धारण करण्यास (यथोचित पालन करणारा) आहे आणि (अग्नि:) अग्नीप्रमाणे (तेजस्वी) आहे. (तस्य) ज्या राजाच्या (राज्यात उगणार्‍या) (अप्सरस:) पाण्यात उगणार्‍या व वाढणार्‍या तसेच (मुद:) आनंद, सुख देणार्‍या (नाम) प्रसिद्ध गुणकारी (औषधय:) औषधी ब्रह्म) ब्रह्मज्ञानी लोकांच्या वंशाचे तसेच (क्षत्रम्) राज्याचे व क्षत्रियकुळांचे (पातु) रक्षण करो (तस्थै) त्या राजासाठी (आमची) स्वाहा (वाट्) सत्य वाणी वा प्रशंसा असावी (आम्ही त्याची स्तुती करतो) कारण तो आम्हाला यथायोग्य आचरण करण्याचे शिकवितो. त्या राजासाठी आणि (ताभ्य:) त्या वर वर्णित केलेले गुण धारण करणार्‍या औषधीसाठी (स्वाहा) आम्ही सत्य कर्म करू (राजाशी प्रामाणिक राहू व औषधीपासून लाभ घेऊ) ॥38॥
Essence
भावार्थ - जो माणूस अग्नी जसा काष्ठाला, त्याप्रमाणे दुष्ट शत्रुवंशाला विनष्ट करतो आणि जो औषधीप्रमाणे सुखदायी आहे, तोच सार्‍या राज्याचे रक्षण करण्यास समर्थ होतो ॥38॥
Subject
राजाने काम करावे (त्याची कर्तव्ये कोणती ?) याविषयी -