Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 37

77 Mantra
18/37
Devata- सम्राड् राजा देवता Rishi- देवा ऋषयः Chhand- आर्षी पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
दे॒वस्य॑ त्वा सवि॒तुः प्रस॑वेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पू॒ष्णो हस्ता॑भ्याम्। सर॑स्वत्यै वा॒चो य॒न्तुर्य॒न्त्रेणा॒ग्नेः साम्रा॑ज्येना॒भिषि॑ञ्चामि॥३७॥

दे॒वस्य॑। त्वा॒। स॒वि॒तुः। प्र॒स॒वे इति॑ प्र॒ऽस॒वे। अ॒श्विनोः॑। बा॒हुभ्या॒मिति॑ बा॒हुऽभ्या॑म्। पू॒ष्णः। हस्ता॑भ्याम्। सर॑स्वत्यै। वा॒चः। य॒न्तुः। य॒न्त्रेण॑ अग्नेः॑। साम्रा॑ज्ये॒नेति॒ साम्ऽरा॑ज्येन। अ॒भिषि॑ञ्चामीत्य॒भिऽसि॑ञ्चामि ॥३७ ॥

Mantra without Swara
देवस्य त्वा सवितुः प्रसवे श्विनोर्बाहुभ्याम्पूष्णो हस्ताभ्याम् । सरस्वत्यै वाचो यन्तुर्यन्त्रेणाग्नेः साम्राज्येनाभिषिञ्चामि ॥

देवस्य। त्वा। सवितुः। प्रसवे इति प्रऽसवे। अश्विनोः। बाहुभ्यामिति बाहुऽभ्याम्। पूष्णः। हस्ताभ्याम्। सरस्वत्यै। वाचः। यन्तुः। यन्त्रेण अग्नेः। साम्राज्येनेति साम्ऽराज्येन। अभिषिञ्चामीत्यभिऽसिञ्चामि॥३७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (एक नागरिक वा प्रजाजन म्हणत आहे) हे विद्यावान राजा, मी (त्वा) आपलणाला (सवितु:) समग्र ऐश्वर्य प्राप्त करून देणार्‍या (देवस्य) स्वप्रकाशस्वरूप परमेश्वराने (प्रसवे) उत्पन्न केलेल्या या जगामधे (सर्व अधिकार देत आहे आपणास राजा वा नेता म्हणून स्वीकारीत आहे) आपण (अश्विनो:) सूर्याप्रमाणे प्रतापी आणि चंद्राप्रमाणे शीतल सुखकारी (आहात) आपण (बाहुभ्याम्) दोन्ही भुजांद्वारा (पूष्ण:) सर्व प्रजाजनांचे पोषण करणारे असून प्राण्यांप्रमाणे धारण व आकर्षणाची शक्ती आपणात आहे. (हस्ताभ्याम्) हाताद्वारे रक्षण करणारे आहात. (सरस्वत्यै) आणि विज्ञानमय (वाच:) वाणीचे (यन्तु:) नियमन करणारे आहात. (अग्ने:) अग्नीच्या विद्युत आदी शक्तीद्वारे (यन्त्रेण) जे यांत्रिक उत्पादन केले जाते, त्यांच्यामुळे (साम्राज्ये) सर्व भूमीचा राजा होण्यासाठी मी (एक प्रजाजन) आपणास (अभिषिञ्चामि) अभिषिक्त करीत आहे अर्थात आपणास राज्यशासन करण्याचे सर्व अधिकार देत आहे. माझ्याप्रमाणे आपणही मला (व सर्व प्रजाजनांना) सुखाने अभिषिक्त करा (सर्वांना सुखी व निर्भय करा) ॥37॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा आहे. (प्रजेसाठी) मनुष्यांसाठी हे हितकर आहे की त्यानी समस्त विद्यांचे ज्ञान मिळविलेल्या, सूर्य आदी पदार्थांच्या गुण-कर्माप्रमाणे स्वभाव असलेल्या व्यक्तीला आपला राजा म्हणून मान्यता द्यावी ॥37॥
Subject
लोकांनी कोणाला आपला राजा मानावे (राजा कसा असावा) याविषयी -