Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 32

77 Mantra
18/32
Devata- अन्नवान् विद्वान् देवता Rishi- देवा ऋषयः Chhand- निचृदार्ष्यनुस्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
वाजो॑ नः स॒प्त प्र॒दिश॒श्चत॑स्रो वा परा॒वतः॑। वाजो॑ नो॒ विश्वै॑र्दे॒वैर्धन॑सातावि॒हाव॑तु॥३२॥

वाजः॑। नः॒। स॒प्त। प्र॒दिशः॒। इति॑ प्र॒दिशः॑। चत॑स्रः। वा॒। प॒रा॒वत॒ इति॑ परा॒ऽवतः॑। वाजः॑। नः॒। विश्वैः॑। दे॒वैः। धन॑साता॒विति॒ धन॑ऽसातौ। इ॒ह। अ॒व॒तु॒ ॥३२ ॥

Mantra without Swara
वाजो नः सप्त प्रदिशश्चतस्रो वा परावतः । वाजो नो विश्वैर्देवैर्धनसाताविहावतु ॥

वाजः। नः। सप्त। प्रदिशः। इति प्रदिशः। चतस्रः। वा। परावत इति पराऽवतः। वाजः। नः। विश्वैः। देवैः। धनसाताविति धनऽसातौ। इह। अवतु॥३२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वज्जनहो, ज्यायोगे (विश्वै:) सर्व (देवै:) विद्वज्जनांसह (न:) आम्हा (प्रजाजनांना) (इह) या लोकामधे (वाज:) अन्नधान्य आणि (धनसातौ) धनप्राप्ती (अवतु) प्राप्त होईल (तुम्ही तसे यत्न करा-तुमच्या यत्नामुळे आम्हाला अन्न-धान्य व धन प्राप्त होवो, ही कामना) (वा) अथवा ज्यायोगे (न:) आम्हाला (वाज:) शास्त्र-ज्ञान आणि प्रगती प्राप्त होईल, वा आमची प्रगती (सप्त) सात (प्रदिश:) दिशांमधे म्हणजे लोक-लोकांतरापर्यंत तसेच (परावत:) दूरदूरपर्यंत होईल (तुम्ही विद्वज्जनांनी तसे आचरण करावे) तसेच (चतुस्र:) पूर्व आदी चारही दिशा आमचे पालन करतील वा आमच्यासाठी त्या सर्व आवश्यक पदार्थांचे रक्षण करील, ते ते आचरण वा प्रयत्न तुम्ही सदैव करीत रहा ॥32॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी ते ते यत्न करावेत की ज्यामुळे अधिकाधिक अन्न-धान्य उत्पन्न होईल आणि पृथ्वीवर सर्वत्र त्यांची (परिश्रमीजन वा उद्योगी) म्हणून कीर्ती पसरेल. त्यामुळे त्यांचे स्वत:चे रक्षणही होईल. ॥32॥
Subject
विद्वज्जनांनी व प्रजाजनांनी कसे आचरण करावे, याविषयी -