Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 27

77 Mantra
18/27
Devata- पशुपालनविद्याविदात्मा देवता Rishi- देवा ऋषयः Chhand- भुरिगार्षी पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
प॒ष्ठ॒वाट् च॑ मे पष्ठौ॒ही च॑ मऽउ॒क्षा च॑ मे व॒शा च॑ मऽऋष॒भश्च॑ मे वे॒हच्च॑ मेऽन॒ड्वाँश्च॑ मे धेनु॒श्च॑ मे य॒ज्ञेन॑ कल्पन्ताम्॥२७॥

प॒ष्ठ॒वाडिति॑ पष्ठ॒ऽवाट्। च॒। मे॒। प॒ष्ठौ॒ही। च॒। मे॒। उ॒क्षा। च॒। मे॒। व॒शा। च॒। मे॒। ऋ॒ष॒भः। च॒। मे॒। वे॒हत्। च॒। मे॒। अ॒न॒ड्वान्। च॒। मे॒। धे॒नुः। च॒। मे॒। य॒ज्ञेन॑। क॒ल्प॒न्ता॒म् ॥२७ ॥

Mantra without Swara
पष्ठवाट्च मे पष्ठौही च मऽउक्षा च मे वशा च मऽऋषभश्च मे वेहच्च मे नड्वाँश्च मे धेनुश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥

पष्ठवाडिति पष्ठऽवाट्। च। मे। पष्ठौही। च। मे। उक्षा। च। मे। वशा। च। मे। ऋषभः। च। मे। वेहत्। च। मे। अनड्वान्। च। मे। धेनुः। च। मे। यज्ञेन। कल्पन्ताम्॥२७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (पशुपालक कामना व्यक्त करीत आहे) (मे) माझे (पष्ठवाट्) पाठीवर भार वाहून नेणारे हत्ती, उंट आदी पशू (च) आणि त्या पशूंशी संबंधित (वासरें, पिलें, वा सेवकगण) तसेच (मे) माझी (पष्ठौही) पाठीवर ओझें वाहणार्‍या घोडी, उंटणी आदी पशू (च) ते वाहून नेत असलेले पदार्थ (माझ्यासाठी हितकर व लाभकारी व्हावेत) (मे) माझा (उक्षा) वीर्य-सेचन कार्यात समर्थ वृषभ (कळू) (च) आणि वीर्य धारण करण्यास समर्थ गाय आदी पशू, तसेच (मे) माझी (माझ्या गोठ्यात असणारी) (वशा) वंध्या (भाकड) गाय (च) आणि प्रजोत्पादनात व शेतीकामात असमर्थ झालेला वीर्यहीन बैल (च) माझे (ऋषभ:) प्रोतीकामासाठी उपयुक्त बैल (च) आणि बलवती गाय (माझ्यासाठी उपयोग असावेत) (मे) माझी (बेहत्) जिचा गर्भ ठरत नाही अशी गाय अथवा वंध्या गाय, तसेच ज्याच्या वीर्यात प्रजोत्पादन शक्ती नाही असा (मे) माझा (अनड्वान्) नांगर, गळा आदीत जुंपणारा समर्थ असा शक्तिमान बैल (य) आणि गाडीवान, सेवक आदी, तसेच (मे) माझी (धेनु:) नवीन व्यालेली दूध देणारी गाय (व) आणि त्याचे दोहन करणारे सेवक, हे सर्व पशू व माणसें (यज्ञेन) पशू पालनरूप यज्ञकर्मामुळे (माझ्यासाठी) समर्थ व हितकारी व्हावेत ॥27॥
Essence
भावार्थ - जे लोक पशूंना चांगले प्रशिक्षण देऊन, उपयोगी कार्यात लावतात, ते आपल्या प्रयोजनात यशस्वी होतात. ॥27॥
Subject
पुनश्च पुढील मंत्रात तोच विषय (पशुपालन) -