Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 26

77 Mantra
18/26
Devata- पशुविद्याविदात्मा देवता Rishi- देवा ऋषयः Chhand- ब्राह्मी बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
त्र्यवि॑श्च मे त्र्य॒वी च॑ मे दित्य॒वाट् च॑ मे दित्यौ॒ही च॑ मे॒ पञ्चा॑विश्च मे पञ्चा॒वी च॑ मे त्रिव॒त्सश्च॑ मे त्रिव॒त्सा च॑ मे तुर्य॒वाट् च॑ मे तुर्यौ॒ही च॑ मे य॒ज्ञेन॑ कल्पन्ताम्॥२६॥

त्र्यवि॒रिति॑ त्रि॒ऽअविः॑। च॒। मे॒। त्र्य॒वीति॑ त्रिऽअ॒वी। च॒। मे॒। दि॒त्य॒वाडिति॑ दित्य॒ऽवाट्। च॒। मे॒। दि॒त्यौ॒ही। च॒। मे॒। पञ्चा॑वि॒रिति॒ पञ्च॑ऽअविः। च॒। मे॒। प॒ञ्चा॒विति॑ पञ्चऽअ॒वी। च॒। मे॒। त्रि॒व॒त्स इति॑ त्रिऽव॒त्सः। च॒। मे॒। त्रि॒व॒त्सेति॑ त्रिऽव॒त्सा। च॒। मे॒। तु॒र्य॒वाडिति॑ तुर्य॒ऽवाट्। च॒। मे॒। तु॒र्यौ॒ही। च॒। मे॒। य॒ज्ञेन॑। क॒ल्प॒न्ताम् ॥२६ ॥

Mantra without Swara
त्र्यविश्च मे त्र्यवी च मे दित्यवाट्च मे दित्यौही च मे पञ्चाविश्च मे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाट्च मे तुर्याही च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥

त्र्यविरिति त्रिऽअविः। च। मे। त्र्यवीति त्रिऽअवी। च। मे। दित्यवाडिति दित्यऽवाट्। च। मे। दित्यौही। च। मे। पञ्चाविरिति पञ्चऽअविः। च। मे। पञ्चाविति पञ्चऽअवी। च। मे। त्रिवत्स इति त्रिऽवत्सः। च। मे। त्रिवत्सेति त्रिऽवत्सा। च। मे। तुर्यवाडिति तुर्यऽवाट्। च। मे। तुर्यौही। च। मे। यज्ञेन। कल्पन्ताम्॥२६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (एक पशुपती वा गोव आदी पशूंचे पालन करणारा अपेक्षा वा इच्छा करीत आहे) (मे) माझा तीन मेंढ्यांचा (कळप (च) तसेच पशुपालनसंबंधी आवश्यक साहित्य, तसेच (मे) माझी (त्र्यवी) तीन मेंढ्यांचे पालन करणारी स्त्री (सेविका अथवा पत्नी (च) आणि मेंढर्‍यांपासून प्राप्त व उत्पन्न घृत आदी पदार्थ (माझ्यासाठी लाभकर व्हावेत) (मे) माझा (दित्यवाट्) (पशुपालन आदी दैनिक कार्यांमधे येणार विघ्न दूर करणारा (माझा सेवक) (च) आणि त्याचे सर्व सहकारी, तसेच (मे) माझे (दित्यौही) दैनिक कार्यांना पूर्तता देणारे गौ आदी पशू (च) आणि त्यांचे रक्षणासाठी होणारी व्यवस्था (माझ्यासाठी सुखकर व्हावी) (मे) माझा (पंचावि:) पाच प्रकारच्या मेंढराचा कळप (च) आणि त्यापासून प्राप्त घृत आदी पदार्थ, तसेच (मे) माझी (पंचावी) पाच प्रकारच्या मेंढरांचे पालन करणारी स्त्री (व माझी पत्नी) (च) आणि त्यासंबंधीचे सर्व कामकाज (माझ्याकरिता सुखमय व्हावे) (मे) माझा (त्रिवत्स:) तीन वासरें असणारा (वा त्यांचे पालन करणारा सेवक) (च) आणि त्याची ती तीन वासरें, तसेच (मे) माझी (त्रिवत्सा) तीन वासरें असणारी गाय (च) आणि तिच्यापासून प्राप्त दुग्ध, घृत आदी पदार्थ (माझ्यासाठी लाभकारी व्हावेत) (मे) माझे (तुय्यविट्) चार वर्ष वयाचा (शेती आदी कामासाठी योग्य झालेला वळू अथवा तरूण) बैल (च) आणि त्याला शेतीकामात गुंतविणे आदी कामें, तसेच (मे) माझी (तुर्योही) चार वर्ष वयाची गाय (च) आणि तिचे (दोहन, पालन आदी कार्य) (यज्ञेन) पशुपालनासंबंधी नियमांमुळे (माझ्यासाठी) (कल्पन्ताम्) समर्थ वा सुखकर व्हावेत ॥26॥
Essence
भावार्थ - या मंत्रात गाय, शेळी आणि आणि मेंढरे या प्राण्यांच्या उल्लेखावरून अन्य पाळीव पशूंचा देखील बोध होत आहे. जे लोक पालनादी कार्याद्वारे या पशूंची वृद्धी करतात, ते या पशूंपासून मिळणार्‍या (दूध, दही, घृत, ताक व मूत्र आदी) रसांचे सेवन करून श्रीमान व आरोग्य संपन्न होतात. ॥26॥
Subject
पुढील मंत्रात पशुपालनाविषयी कथन केले आहे -