Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 16

77 Mantra
18/16
Devata- अग्नदिविद्याविदात्मा देवता Rishi- देवा ऋषयः Chhand- निचृदतिशक्वरी Swara- पञ्चमः
Mantra with Swara
अ॒ग्निश्च॑ म॒ऽइन्द्र॑श्च मे॒ सोम॑श्च म॒ऽइ॒न्द्र॑श्च मे सवि॒ता च॑ म॒ऽइन्द्र॑श्च मे॒ सर॑स्वती च म॒ऽइन्द्र॑श्च मे पू॒षा च॑ म॒ऽइन्द्र॑श्च मे॒ बृह॒स्पति॑श्च म॒ऽइन्द्र॑श्च मे य॒ज्ञेन॑ कल्पन्ताम्॥१६॥

अ॒ग्निः। च॒। मे॒। इन्द्रः॑। च॒। मे॒। सोमः॑। च॒। मे॒। इन्द्रः॑। च॒। मे॒। स॒वि॒ता। च॒। मे॒। इन्द्रः॑। च॒। मे॒। सर॑स्वती। च॒। मे॒। इन्द्रः॑। च॒। मे॒। पू॒षा। च॒। मे॒। इन्द्रः॑। च॒। मे॒। बृह॒स्पतिः॑। च॒। मे॒। इन्द्रः॑। च॒। मे॒। य॒ज्ञेन॑। क॒ल्प॒न्ता॒म् ॥१६ ॥

Mantra without Swara
अग्निश्च मऽइन्द्रश्च मे सोमश्च मऽइन्द्रश्च मे सविता च मऽइन्द्रश्च मे सरस्वती च मऽइन्द्रश्च मे पूषा च मऽइन्द्रश्च मे बृहस्पतिश्च मऽइन्द्रश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥

अग्निः। च। मे। इन्द्रः। च। मे। सोमः। च। मे। इन्द्रः। च। मे। सविता। च। मे। इन्द्रः। च। मे। सरस्वती। च। मे। इन्द्रः। च। मे। पूषा। च। मे। इन्द्रः। च। मे। बृहस्पतिः। च। मे। इन्द्रः। च। मे। यज्ञेन। कल्पन्ताम्॥१६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (मे) माझा (अग्नि:) सूर्यरुप अग्नी (च) आणि पृथ्वीवर मिळणारा भौतिक अग्नी, तसेच (मे) माझा) (इन्द्र:) विद्युत रुप अग्नी (च) आणि पवन (माझ्यासाठी समर्थ वा लाभकारी होवोत) (मे) माझा (सोम:) शान्तिगुणाने समृद्ध पदार्थ अथवा शांत स्वभावाचा माणूस (च) आणि वृष्टीजल, तसेच (मे) माझा (इन्द्र:) अन्याय दूर करणारा राष्ट्राचा सभापती (च) आणि त्या सभेतील सर्व सदस्य (मला हितकर व्हावेत/असावेत) (मे) माझे (सविता) ऐश्वर्यशाली वा कीर्तीनंतर कार्य (च) आणि ते करण्यासाठी आवश्यक ती साधनें, तसेच (मे) माझा (इन्द्र:) समस्त अविद्येचा नाश करणारा अध्यापक (च) आणि विद्यार्थी (माझ्यासाठी हितकर व्हावेत) (मे) माझी (सरस्वती) प्रशंसनीय ज्ञान देणारी प्रबोधन करणारी वाणी (च) आणि सत्यभाषण करणारा वक्ता, तसेच (मे) माझा (इन्द्रहु:) विद्यार्थ्याच्या जडत्वाचा, अज्ञानाचा नाश करणारा उपदेशक (च) आणि श्रोता (मला हितकारी असावेत) (मे) माझा (पूषा) पूषण व शक्ती देणारा (सभापती वा वैद्य) (च) आणि (मला) योग्य आहार, विहार, शयन आदी विषयी प्रेरणा देणारा (गुरु) तसेच (मे) माझा पोषण विद्येत पारंगत (आरोग्याचे रक्षण करणारा) (च) आणि चतुर वैद्य (मला हितकर असावेत) (मे) माझा (बृहस्थपि:) मोठमोठ्या व्यवहारांचे रक्षण करणारा (मला सांभाळून घेणारा) अधिकारी (च) आणि राजा, तसेच (मे) माझा (इन्द्र:) ऐश्वर्याची वृद्धी करणारी उद्यमशील व्यक्ती (उद्योगपती) (च) आणि सेनापती हे सर्व माझ्यासाठी (यज्ञेन) विद्या आणि ऐश्वर्याद्वारे (मला ज्ञान आणि धन देऊन) (कल्पन्ताम्) सामर्थ्यवान असावेत ॥16॥
Essence
भावार्थ -हे मनुष्यानो, तुम्ही चांगले विचार ठेऊन आपल्या सर्व पदार्थांचा उपयोग, सज्जनांच्या पालन-कार्यासाठी आणि दुष्टांना दंडित करण्यासाठी करा. अशा प्रकारे निरंतर कार्यमग्न रहा ॥16॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय-