Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 14

77 Mantra
18/14
Devata- अग्न्यादियुक्ता आत्मा देवता Rishi- देवा ऋषयः Chhand- भुरिगष्टिः Swara- मध्यमः
Mantra with Swara
अ॒ग्निश्च॑ म॒ऽआप॑श्च मे वी॒रुध॑श्च म॒ऽओष॑धयश्च मे कृष्टप॒च्याश्च॑ मेऽकृष्टप॒च्याश्च॑ मे ग्रा॒म्याश्च॑ मे प॒शव॑ऽआर॒ण्याश्च॑ मे वि॒त्तञ्च॑ मे॒ वित्ति॑श्च मे भू॒तञ्च॑ मे॒ भूति॑श्च मे य॒ज्ञेन॑ कल्पन्ताम्॥१४॥

अ॒ग्निः। च॒। मे॒। आपः॑। च॒। मे॒। वी॒रुधः॑। च॒। मे॒। ओष॑धयः। च॒। मे॒। कृ॒ष्ट॒प॒च्याः इति॑ कृष्टऽप॒च्याः। च॒। मे॒। अ॒कृ॒ष्ट॒प॒च्या इत्य॑कृष्टऽप॒च्याः। च॒। मे॒। ग्रा॒म्याः। च॒। मे॒। प॒शवः॑। आ॒र॒ण्याः। च॒। मे॒। वि॒त्तम्। च॒। मे॒। वित्तिः॑। च॒। मे॒। भू॒तम्। च॒। मे॒। भूतिः॑। च॒। मे॒। य॒ज्ञेन॑। क॒ल्प॒न्ता॒म् ॥१४ ॥

Mantra without Swara
अग्निश्च मऽआपश्च मे वीरुधश्च मऽओषधयश्च मे कृष्टपच्याश्च मे कृष्टपच्याश्च मे ग्राम्याश्च मे पशवऽआरण्याश्च मे वित्तं च मे वित्तिश्च मे भूतञ्च मे भूतिश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥

अग्निः। च। मे। आपः। च। मे। वीरुधः। च। मे। ओषधयः। च। मे। कृष्टपच्याः इति कृष्टऽपच्याः। च। मे। अकृष्टपच्या इत्यकृष्टऽपच्याः। च। मे। ग्राम्याः। च। मे। पशवः। आरण्याः। च। मे। वित्तम्। च। मे। वित्तिः। च। मे। भूतम्। च। मे। भूतिः। च। मे। यज्ञेन। कल्पन्ताम्॥१४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (मे) माझा (अग्नि:) अग्नी (च) आणि विद्युत आदी (अग्नीची विविध रुपे) तसेच (मे) माझे (आप:) जल (च) आणि जलात (समुद्रात उत्पन्न होणारे मोती पोवळे आदी) पदार्थ (शिल्पाविद्येद्वारे माझ्यासाठी उपयोगी व्हावेत) (मे) माझ्या (वीरूध:) वेली, झाडी आदी (च) आणि शाक आदी भोज्य वस्तू, तसेच (मे) माझी (ओषधय:) सोमलता आदी औषदी (च) आणि उपयोगी फळे, पुष्प आदी (माझ्या शिल्प विद्येमुळे माझ्यासाठी हितकर व्हावेत) (मे) माझे वा माझ्यासाठी उपयोगी (कृष्टपच्या:) शेतीत पिकणारे धान्य आदी (च) आणि त्यापासून तयार केलेले उत्तम अन्न, तसेच (मे) माझे ते धान्य की जे (अकृष्टपच्या:) शेतीत पिकविलेले नसून नैसर्गिक वनात उगवते (ते धान्य (च) आणि पर्वत वा वनादी स्थानात पिकविले वा शिजविले जाणारे अन्न (माझ्यासाठी पुष्टिकर व्हावे) (मे) माझे (ग्राम्या:) गावात राहणारे गौ आदी पाळीव प्राणी (च) आणि नगरात असणारे पशू, तसेच (मे) माझे (आरण्या:) वनात राहणारे मृग (च) आणि सिंह आदी प्राणी (माझ्यासाठी सुखकर व्हावेत) (मे) माझे (वित्तम्) प्राप्त केलेले पदार्था (च) आणि इतर धन, तसेच (मे) माझी (वित्ति:) सर्व प्राप्त अर्जित धन-संपदा (च) आणि जे अजून मी प्राप्त करायची आहे, ती संपत्ती (माझाकरिता सुखकर व्हावी) (मे) माझे (भूतम्) रुप (च) आणि विविध प्रकारचे पदार्थ, तसेच (मे) माझे (भूति:) ऐश्वर्य (च) आणि तिच्या प्राप्तीची साधने वा उपाय, हे सर्व पदार्थ मिश्रण, (परिक्षण, प्रयोग आणि ज्ञान आदी द्वारे प्राप्त) शिल्पविद्येमुळे मला सुखदायक (कल्पन्ताम्) व्हावेत ॥14॥
Essence
भावार्थ - जे लोक अग्नी आदी विविध विद्यांचे ज्ञान संपादित करून संगती करविणार्‍या (सर्वांना एकत्र आणणार्‍या) शिल्पविद्या रुप यज्ञ करतात, ते अवश्य ऐश्वर्य प्राप्त करतात. ॥14॥
Subject
पुन्हा, तोच विषय -