Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 12

77 Mantra
18/12
Devata- धान्यदा आत्मा देवता Rishi- देवा ऋषयः Chhand- भुरिगतिशक्वरी Swara- पञ्चमः
Mantra with Swara
व्री॒हय॑श्च मे॒ यवा॑श्च मे॒ माषा॑श्च मे॒ तिला॑श्च मे मु॒द्गाश्च॑ मे॒ खल्वा॑श्च मे प्रि॒यङ्ग॑वश्च॒ मेऽण॑वश्च मे श्या॒माक॑ाश्च मे नी॒वारा॑श्च मे गो॒धूमा॑श्च मे म॒सूरा॑श्च मे य॒ज्ञेन॑ कल्पन्ताम्॥१२॥

व्री॒हयः॑। च॒। मे॒। यवाः॑। च॒। मे॒। माषाः॑। च॒। मे॒। तिलाः॑। च॒। मे॒। मु॒द्गाः। च॒। मे॒। खल्वाः॑। च॒। मे॒। प्रि॒यङ्ग॑वः। च॒। मे॒। अण॑वः। च॒। मे॒। श्या॒माकाः॑। च॒। मे॒। नी॒वाराः॑। च॒। मे॒। गो॒धूमाः॑। च॒। मे॒। म॒सूराः॑। च॒। मे॒। य॒ज्ञेन॑। क॒ल्प॒न्ता॒म् ॥१२ ॥

Mantra without Swara
व्रीहयश्च मे यवाश्च मे माषाश्च मे तिलाश्च मे मुद्राश्च मे खल्वाश्च मे प्रियङ्गवश्च मे णवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे गोधूमाश्च मे मसूराश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥

व्रीहयः। च। मे। यवाः। च। मे। माषाः। च। मे। तिलाः। च। मे। मुद्गाः। च। मे। खल्वाः। च। मे। प्रियङ्गवः। च। मे। अणवः। च। मे। श्यामाकाः। च। मे। नीवाराः। च। मे। गोधूमाः। च। मे। मसूराः। च। मे। यज्ञेन। कल्पन्ताम्॥१२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (उपासक कामना करीत आहे) (मे) माझे (ब्रीह्य:) तांदूळ (च) आणि साळी तसेच (मे) माझे (युवा:) जनधान्य (च) आणि तूर आदी धान्य अन्नदाता परमेश्वराच्या कृपेने मला शक्तिदायी होवोत) (मे) माझे (भाषा:) उडीद (च) आणि मटार, वाटाणे, तसेच (मे) माझे (तिला:) तीक (च) आणि नारळ (शक्तिदायी होवो) (मे) माझे (मुद्गा:) मूग (च) आणि त्यापासून निर्मित होणारे पदार्थ, तसेच (मे) माझे (खल्वा:) चणे, हरभरे (च) आणि त्यापासून बनविलेले पदार्थ (माझ्यासाठी शक्तिदायी व्हावेत) (मे) माझे (प्रियङ्गव:) कंगुनी (हिंदीनाम), वरी (तृणधान्य) (च) आणि त्यापासून तयार केलेले पदार्थ, तसेच (मे) माझे (अणव:) लहान व हलके (कणी-कणकीचे) तांदूळ (च) आणि त्यापासून निर्मित भोज्य पदार्थ, तसेच (मे) माझे (श्यामाका:) कमी कस असलेले धान्य, नाचणी, आदी (च) (हिन्दी नाम महुआ, पटेरा, चेना) आदी हलके धान्य (माझ्यासाठी हितकारी व्हावेत) (मे) माझे (नीवारा:) नैसर्गिक म्हणजे त तांदूळ की जे न पेरता स्वत:च भूमीत उपजतात (मी वन, आदी भूभागातून वेचून जमा केलेले धान्य) (च) आणि त्यापासून निर्मित (भाजी, चटणी आदी) पदार्थ, तसेच (मे) माझे (गोधूमा:) गहू (च) आणि गव्हापासून बनवलेले खाद्यपदार्थ याशिवाय (मे) माझे (मसूरा:) मसूर (च) आणि तत्संबंधी अन्य धान्य, हे वरील सर्व (यज्ञेन) सर्व अन्नांचा जो प्रदाता परमेश्वर त्याच्या कृपेने मला प्राप्त व्हावेत तसेच शक्तिदायक व्हावेत ॥12॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी चांगले तांदूळ व त्यापासून चांगल्याप्रकारे तयार केलेले भात आदी भोज्यपदार्थाची अग्नीमधे आहुती देऊन होम केला पाहिजे. तसेच स्वत: तो भात खावा आणि इतरांनाही खाण्यास द्यावा। (सर्वांसह प्राप्त अन्नधान्याचा उपयोग घ्यावा) ॥12॥
Subject
पुढील मंत्रातही तोच विषय-