Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 1

77 Mantra
18/1
Devata- अग्निर्देवता Rishi- देवा ऋषयः Chhand- शक्वरी Swara- धैवतः
Mantra with Swara
वाज॑श्च मे प्रस॒वश्च॑ मे॒ प्रय॑तिश्च मे॒ प्रसि॑तिश्च मे धी॒तिश्च॑ मे॒ क्रतु॑श्च मे॒ स्व॑रश्च मे॒ श्लोक॑श्च मे॒ श्र॒वश्च॑ मे॒ श्रुति॑श्च मे॒ ज्योति॑श्च मे॒ स्वश्च मे य॒ज्ञेन॑ कल्पन्ताम्॥१॥

वाजः॑। च॒। मे॒। प्र॒स॒व इति॑ प्रऽस॒वः। च॒। मे॒। प्रय॑ति॒रिति॒ प्रऽय॑तिः। च॒। मे॒। प्रसि॑ति॒रिति॒ प्रऽसि॑तिः। च॒। मे॒। धी॒तिः। च॒। मे॒। क्रतुः॑। च॒। मे॒। स्वरः॑। च॒। मे॒। श्लोकः॑। च॒। मे॒। श्र॒वः। च॒। मे॒। श्रुतिः॑। च॒। मे॒। ज्योतिः॑। च॒। मे॒। स्व᳖रिति॒ स्वः᳖। च॒। मे॒। य॒ज्ञेन॑। कल्प॒न्ताम् ॥१ ॥

Mantra without Swara
वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रवश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे स्वश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥

वाजः। च। मे। प्रसव इति प्रऽसवः। च। मे। प्रयतिरिति प्रऽयतिः। च। मे। प्रसितिरिति प्रऽसितिः। च। मे। धीतिः। च। मे। क्रतुः। च। मे। स्वरः। च। मे। श्लोकः। च। मे। श्रवः। च। मे। श्रुतिः। च। मे। ज्योतिः। च। मे। स्वरिति स्वः। च। मे। यज्ञेन। कल्पन्ताम्॥१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (ईश्वराचा उपासक अथवा धर्मानुष्ठान करणारा सांसारिक मनुष्य इच्छा करीत आहे की) (मे) माझे वा माझ्या (वाज:) अन्न (च) आणि विशेष ज्ञान (सुखकारी होवो) (मे) माझे (प्रसवा) ऐश्वर्य (च) आणि त्याच्या उपयोगाची पद्धती (सुखकारी व्हावी) (मे) माझे (प्रयति:) उत्तम आचरणासाठी केले जाणारे यत्न (च) आणि त्याची साधनें (सुखकारी व्हावीत) (मे) माझी (प्रसिति:) सर्व व्यवस्था (च) आणि त्या व्यवस्थेचे रक्षण (सुखकारी होवो) (मे) माझी (धीति:) धारणा (च) आणि ध्याय तसेच (मे) माझी (क्रतु:) श्रेष्ठ बुद्धी (च) आणि (कार्याविषयीचा) उत्साहा (सुखकारी होवो) (मे) माझे (स्वर:) स्वातंत्र्य (च) आणि तेज असेच (मे) माझी पदरचना करणारी वाणी (च) आणि त्याचे उच्चारण (सुखकारी होवो) (मे) माझे (श्रवण:) ऐकणे (च) आणि ऐकवणे तसेच (मे) माझी (श्रुति:) समस्त विद्यांचे ज्ञान देणारी वेदविद्या (च) आणिश त्यानुकुल असलेली स्मृती अर्थात धर्म शास्त्र (सुखकारी होवो) (मे) माझे स्वत:चे (ज्योति:) विद्येचे ज्ञान (च) आणि इतरांना मी देत असलेली विद्या तसेच (मे) माझे वैयक्तिक सुख (च) आणि अन्यजनांचे सुख (हितकारी होवो) (यज्ञेन) (वरील सर्व उपासनीय परमेश्वराच्या उपासनेसाठी आणि जगाचे उपकारी असे व्यवहार करण्यासाठी (कल्पनाम्) समर्थ होवोत (वरील सर्व कर्मे करण्यासाठी मी समर्थ व्हावे, ही इच्छा) ॥1॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, तुम्ही सर्वांना (तुमच्या व्यतिरिक्त अन्य जनांना) सुख देण्याकरिता अन्न आदी पदार्थ देऊन सुखी करा. त्यासाठी ईश्वराची उपासना करा आणि अशी कामें करा की ज्यायोगे संसाराचा उपकार होईल आणि सर्व मनुष्यांची उन्नती होईल. ॥1॥
Subject
आता अठराव्या अध्यायाचा आरंभ होत आहे. या अध्यायाच्या प्रथम मंत्रात हे सांगितले आहे की मनुष्यांनी ईश्वरापासून (उपासनेद्वारा) तसेच धर्माच्या अनुष्ठानाद्वारे कोणकोणती कार्ये सिद्ध केली पाहिजेत.