Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 98

99 Mantra
17/98
Devata- यज्ञपुरुषो देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- आर्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अ॒भ्यर्षत सुष्टु॒तिं गव्य॑मा॒जिम॒स्मासु॑ भ॒द्रा द्रवि॑णानि धत्त। इ॒मं य॒ज्ञं न॑यत दे॒वता॑ नो घृ॒तस्य॒ धारा॒ मधु॑मत्पवन्ते॥९८॥

अ॒भि। अ॒र्ष॒त॒। सु॒ष्टु॒तिम्। सु॒स्तु॒तिमिति॑ सुऽस्तु॒तिम्। गव्य॑म्। आ॒जिम्। अ॒स्मासु॑। भ॒द्रा। द्रवि॑णानि। ध॒त्त॒। इ॒मम्। य॒ज्ञम्। न॒य॒त॒। दे॒वता॑। नः॒। घृ॒तस्य॑। धाराः॑। मधु॑म॒दिति॒ मधु॑ऽमत्। प॒व॒न्ते॒ ॥९८ ॥

Mantra without Swara
अभ्यर्षत सुष्टुतिङ्गव्यमाजिमस्मासु भद्रा द्रविणानि धत्त । इमँयज्ञन्नयत देवता नो घृतस्य धारा मधुमत्पवन्ते ॥

अभि। अर्षत। सुष्टुतिम्। सुस्तुतिमिति सुऽस्तुतिम्। गव्यम्। आजिम्। अस्मासु। भद्रा। द्रविणानि। धत्त। इमम्। यज्ञम्। नयत। देवता। नः। घृतस्य। धाराः। मधुमदिति मधुऽमत्। पवन्ते॥९८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ- हे विवाहित स्त्री-पुरुषहो, तुम्ही उत्तम आचरणाने (सुष्टुतिम्‌) (सर्वांकडून) प्रशंसा प्राप्त करा तसेच (अजिम्‌) ज्याद्वारे श्रेष्ठ करणीय कर्म जाणले जातात (म्हणजे जीवनातील संघर्ष आणि त्याद्वारे प्राप्त अनुभव लोक घेतात) त्या जीवनात संग्रामाला आणि (गव्यम्‌) वाणीद्वारा प्राप्त ज्ञान तसेच गौदुग्ध, दही, घृत आदी वस्तू (अभ्यर्षत) प्राप्त करा. (उत्तम ज्ञान, उत्तम वाणी आणि उत्तम पदार्थ प्राप्त करण्यासाठी सदैव तत्पर रहा) हे (देवता) विद्वज्जन, आपण (अस्मसु) आमच्यामधे वा आमच्यासाठी (भद्रा) अति आनंदकारी (द्रविणायि) धन (धत्त) व धारण करा (आम्हाला श्रेष्ठ संपत्ती द्या) (इमम्‌) या (यज्ञम्‌) गृहाश्रमात प्राप्त करण्यास (शिकण्यास) योग्य अशा आचरणाकडे आम्हाला (नयत) ज्या. तसेच (घृतस्य) प्राप्त ज्ञानाद्वारे (धारा:) सुशिक्षायुक्त वाणीचा उपयोग करीत (मधुमत्‌) ज्या रीतीने मधुर संभाषण (पक्ते) प्राप्त करता येईल, त्या वाणी व ती रीती आम्हाला शिकवा) ॥98॥
Essence
भावार्थ - स्त्री-पुरुषाचे कर्तव्य आहे की त्यानी सर्वांशी मित्रवत आचरण करणारे, अशी कीर्ती मिळवावी. अशी संपत्ती प्रभूतपणे मिळवावी की जी जसे स्वत: करिता तसेच इतरांकरिताही अतीव सुखकारी असेल. तसेच गृहाश्रमी स्त्री-पुरुषांनी आपल्या परम पुरुषार्याद्वारे गृहाश्रमाची शोभा वाढवावी आणि सदैव वेदविद्येचा प्रचार-प्रसार करावा. ॥98॥
Subject
विवाहित स्त्री-पुरुषांची कर्तव्यकर्में काय, याविषयी –