Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 95

99 Mantra
17/95
Devata- यज्ञपुरुषो देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- आर्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
सिन्धो॑रिव प्राध्व॒ने शू॑घ॒नासो॒ वात॑प्रमियः पतयन्ति य॒ह्वाः। घृ॒तस्य॒ धारा॑ऽअरु॒षो न वा॒जी काष्ठा॑ भि॒न्दन्नू॒र्मिभिः॒ पिन्व॑मानः॥९५॥

सिन्धो॑रि॒वेति॒ सिन्धाःऽइव। प्रा॒ध्व॒न इति॑ प्रऽअध्व॒ने। शू॒घ॒नासः॑। वात॑प्रमिय॒ इति॒ वात॑ऽप्रमियः। प॒त॒य॒न्ति॒। य॒ह्वाः। घृतस्य॑। धाराः॑। अ॒रु॒षः। न। वा॒जी। काष्ठाः॑। भि॒न्दन्। ऊ॒र्मिभि॒रित्यू॒र्मिः॑। पिन्व॑मानः ॥९५ ॥

Mantra without Swara
सिन्धोरिव प्राध्वने शूघनासो वातप्रमियः पतयन्ति यह्वाः । घृतस्य धारा अरुषो न वाजी काष्ठा भिन्दन्नूर्मिभिः पिन्वमानः ॥

सिन्धोरिवेति सिन्धाःऽइव। प्राध्वन इति प्रऽअध्वने। शूघनासः। वातप्रमिय इति वातऽप्रमियः। पतयन्ति। यह्वाः। घृतस्य। धाराः। अरुषः। न। वाजी। काष्ठाः। भिन्दन्। ऊर्मिभिरित्यूर्मिः। पिन्वमानः॥९५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, (प्राध्वने) जलप्रवाहाच्या मार्गाने ज्याप्रमाणे (तिन्धोरिव) नदी वाहते आणि त्या जलावर (शूघनास:) शीघ्र चलणाऱ्या (वातप्रमिय:) वायूच्या लहरी धावत असतात (त्याप्रमाणे उपदेशकाच्या मुखातून निघणाऱ्या वेदवाणी तुमच्याकडे येतात, त्या तुम्ही ग्रहण करा.) तसेच (न) ज्याप्रमाणे (काष्ठा:) रणक्षेत्राला (शत्रुसैन्याला) (भिन्दन्‌) छिन्न-भिन्न करणारा आणि (ऊर्मिभि:) शत्रुसैन्याला छिन्न करताना वाहणाऱ्या श्रमरुप घामाद्वारे (पिन्वमान:) रणभूमीला सिंचन करणारा एक (अकष:) चतुर (वाजी) वेगवान घोडा दौडतो, तद्वत (यह्वा:) अत्यंत ग्रहन अशी (घृतस्य) विज्ञानाची (उपदेशाची) (धारा:) वाणी (पतयन्ति) उपदेशकाच्या मुखातून निघून श्रोत्यांच्या कानांवर येतात, तुम्ही त्या वाणीचा स्वीकार करा. ॥95॥
Essence
भावार्थ - या मंत्रात दोन उपमा अलंकार आहेत, जे लोक कार्यसिद्धीकरिता शीघ्रता करतात (लवकरात लवकर कार्यपूर्ण करतात) आणि घोड्याच्या वेगाप्रमाणे गतिमान असून जे कीर्तीमंत असतात तसेच परोपकारदृष्टीने इतरांना उपदेश, देतात. आणि महान्‌ दु:ख सहन करण्याची ज्याची क्षमता असते, ते लोक आणि त्यांचा उपदेश ऐकणारे श्रोते या जगाचे स्वामी होतात, अन्य लोक कदापि नव्हे. ॥95॥
Subject
पुनश्‍च, तोच विषय –