Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 94

99 Mantra
17/94
Devata- यज्ञपुरुषो देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- निचृदार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
स॒म्यक् स्र॑वन्ति स॒रितो॒ न धेना॑ऽअ॒न्तर्हृ॒दा मन॑सा पू॒यमा॑नाः। ए॒तेऽअ॑र्षन्त्यू॒र्मयो॑ घृ॒तस्य॑ मृ॒गाऽइ॑व क्षिप॒णोरीष॑माणाः॥९४॥

स॒म्यक्। स्र॒वन्ति॒। स॒रितः॑। न। धेनाः॑। अ॒न्तः। हृ॒दा। मन॑सा। पू॒यमा॑नाः। ए॒ते। अ॒र्ष॒न्ति॒। ऊ॒र्मयः॑। घृ॒तस्य॑। मृ॒गाःऽइ॑व। क्षि॒प॒णोः। ईष॑माणाः ॥९४ ॥

Mantra without Swara
सम्यक्स्रवन्ति सरितो न धेनाऽअन्तर्हृदा मनसा पूयमानाः । एतेऽअर्षन्त्यूर्मयो घृतस्य मृगाऽइव क्षिपणोरीषमाणाः ॥

सम्यक्। स्रवन्ति। सरितः। न। धेनाः। अन्तः। हृदा। मनसा। पूयमानाः। एते। अर्षन्ति। ऊर्मयः। घृतस्य। मृगाःऽइव। क्षिपणोः। ईषमाणाः॥९४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, जी वेदवाणी (अन्त:हृदा) शरीरामध्ये (मनसा) शुद्ध अलंकरणाद्वारा (पूयमाना:) पवित्र झालेली (धेना:) वेदवाणी (सरिता:) (न) नद्या प्रमाणे (सम्यक्‌) चांगल्याप्रकारे (शांतपणे शरीरात व मनात) (सुवन्ति) वाहते (वेदवाणीचे चिंतन मनात व आचरण शरीराने होते) त्या (एले) या वाणीद्वारे (घृतस्य) आनंतरिक ज्ञानाच्या ज्या (ऊर्मय:) लहरी (हृदयात ठेवतात) त्या कशाप्रकारे? की जसे (क्षिपणो:) हिंसक शिकाऱ्याच्या भीतीमुळे (ईषमाण:) दूर पळणारे (मृगा इव) हरिण असतात, तद्वत त्यालहरी (हृदयात) (अर्षन्ति) उठतात आणि सर्वांपर्यंत पोचतात. हे मनुष्यानो, तुम्ही देखील त्या वेद वाणीला प्राप्त करा, जाणून घ्या. ॥94॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा आणि वाचकलुप्तोपमा अलंकार आहेत. ज्याप्रमाणे नदी समुद्राकडे जाते, त्याप्रमाणे आकाशामधे व्याप्त जो शब्दसमूह आहे, तो आकाशात सहज विचरण करतो (शब्द नित्य असल्यामुळे आकाशात नेहमी असतो) कारण शब्द आकाशाचे गुण आहे. ज्याप्रमाणे समुद्रात तरंग चालत असतात, अथवा जसे पारध्याला पाहून भयभीत मृग इकडे-तिकडे पळतात, त्याप्रमाणे सर्व प्राण्याच्या शरीरस्थित विज्ञानाद्वारे पवित्र झालेली वाणी सर्वत्र प्रचरित होत असते. जे लोक शस्त्रांचा अभ्यास करून आणि सत्यभाषण करून आपली वाणी पवित्र करतात, तेच शुद्ध होतात. ॥94॥
Subject
पुन्हा तोच विषय-