Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 93

99 Mantra
17/93
Devata- यज्ञपुरुषो देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- निचृदार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
ए॒ताऽअ॑र्षन्ति॒ हृद्या॑त् समु॒द्राच्छ॒तव्र॑जा रि॒पुणा॒ नाव॒चक्षे॑। घृ॒तस्य॒ धारा॑ऽअ॒भि चा॑कशीमि हिर॒ण्ययो॑ वेत॒सो मध्य॑ऽआसाम्॥९३॥

ए॒ताः। अ॒र्ष॒न्ति॒। हृद्या॑त्। स॒मु॒द्रात्। श॒तव्र॑जा॒ इति॑ श॒तऽव्र॑जाः। रि॒पुणा॑। न। अ॒व॒चक्ष॒ इत्य॑ऽव॒चक्षे॑। घृ॒तस्य॑। धाराः॑। अ॒भि। चा॒क॒शी॒मि॒। हि॒र॒ण्ययः॑। वे॒त॒सः। मध्ये॑। आ॒सा॒म् ॥९३ ॥

Mantra without Swara
एताऽअर्षन्ति हृद्यात्समुद्राच्छतव्रजा रिपुणा नावचक्षे । घृतस्य धाराऽअभिचाकशीमि हिरण्ययो वेतसो मध्यऽआसाम् ॥

एताः। अर्षन्ति। हृद्यात्। समुद्रात्। शतव्रजा इति शतऽव्रजाः। रिपुणा। न। अवचक्ष इत्यऽवचक्षे। घृतस्य। धाराः। अभि। चाकशीमि। हिरण्ययः। वेतसः। मध्ये। आसाम्॥९३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जी वाणी (वेदवाणी) (रिपुणा) शूत्रद्वारा अथवा चोराद्वारा (न अवचक्षे) नष्ट वा विकृत होणे शक्य नाही आणि (शतुव्रजा:) ज्याच्या विस्ताराचे शेकडो मार्ग आहेत, अशा (एता:) त्या वाणी (हृद्यात्‌ समुद्रात) हृदयाकाशातून (अर्षन्ति) निघतात (आसाम्‌) या वैदिकधर्मयुक्त वाणीच्या (मध्ये) मधे (वेदमंत्राच्या घोषात) (घृतस्य) (धारा:) तुपाच्या धारा ज्याप्रमाणे अग्नीमधे पडतात, त्याप्रमाणे जी वेदवाणी मनुष्यावर वर्षतो त्या (हिरण्यय:) तेजस्वी (वेतस:) सुंदर वाणीचा मी (अभि चाकशीनि) सर्वथा स्वीकार करतो (वा तिचा प्रचार-प्रसार करतो) ॥93॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. वेदवाणी पवित्र विज्ञानयुक्त, अनेकप्रकारची असून शत्रूंद्वारे नष्ट न होणारी आहे आणि जी, तूप जसे अग्नीला प्रज्वलित करते, तद्वत श्रोत्यांना प्रसन्न करणारी आहे, अशा वेदवाणीचा उपदेशक विद्वान लोक अध्ययन, वाचन, उपदेश करतात. सर्व मनुष्यांनी देखील विद्वज्जनांप्रमाणे वेदवाणी प्राप्त केली पाहिजे ॥93॥
Subject
माणसाने कसे बोलावे (वाणी कशी असावी) याविषयी-