Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 91

99 Mantra
17/91
Devata- यज्ञपुरुषो देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- विराडार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
च॒त्वारि॒ शृङ्गा॒ त्रयो॑ऽअस्य॒ पादा॒ द्वे शी॒र्षे स॒प्त हस्ता॑सोऽअस्य। त्रिधा॑ ब॒द्धो वृ॑ष॒भो रो॑रवीति म॒हो दे॒वो मर्त्याँ॒ २ऽआवि॑वेश॥९१॥

च॒त्वारि॑। शृङ्गा॑। त्रयः॑। अस्य॑। पादाः॑। द्वेऽइति॒ द्वे। शी॒र्षेऽइति॑ शी॒र्षे। स॒प्त। हस्ता॑सः। अ॒स्य॒। त्रिधा॑। ब॒द्धः। वृ॒ष॒भः। रो॒र॒वी॒ति॒। म॒हः। दे॒वः। मर्त्या॑न्। आ। वि॒वे॒श॒ ॥९१ ॥

Mantra without Swara
चत्वारि शृङ्गा त्रयोऽअस्य पादा द्वे शीर्षे सप्त हस्तासोऽअस्य । त्रिधा बद्धो वृषभो रोरवीति महो देवो मर्त्याँऽआ विवेश ॥

चत्वारि। शृङ्गा। त्रयः। अस्य। पादाः। द्वेऽइति द्वे। शीर्षेऽइति शीर्षे। सप्त। हस्तासः। अस्य। त्रिधा। बद्धः। वृषभः। रोरवीति। महः। देवः। मर्त्यान्। आ। विवेश॥९१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(या मंत्राच्या काही शब्दांचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ यज्ञपक्षाकडे आणि दुसरा अर्थ-शब्दपक्षाकडे लागू होतो)^(हा मंत्र काव्यरचनेचे सुंदर उदाहरण आहे. यामध्ये दोन काच्या अलंकारांचा कौशल्यपूर्ण उपयोग केला आहे. एक काव्यालंकार आहे-श्‍लेष, म्हणजे शब्दश्‍लेषालंकार आणि दुसरा काव्यालंकार आहे-रुपक अलंकार रुपकालकाराचे दोन भेद असतात-एक सांग रुपक, दुसरा निरंग रुपक. या मंत्रात सांगरुपक अलंकार आहे)^(या मंत्राचा मुख्यार्थ म्हणजे शब्दाचा पहिला अर्थ म्हणजे शब्दकोशातील अर्थ घेतला, तर मोठा गमतीदार अर्थ निघतो-तो अर्थ असा- एक भयदायक विचित्र प्राणी आमच्या शरीरात व मर्त्यलोकात येऊन प्रविष्ट झाला आहे - त्याला चार शिंगे आहेत, तीन पाय आहेत, दोन शीर असून याला सात हात आहेत. तीन दोरखंडांनी बांधलेला हा मोठा विकराळ बैल आमच्या या घरात प्रविष्ट झाला आहे. (पण हा अर्थ अपेक्षित व ?? अर्थ नाही) वरील मुख्यार्थ केल्यामुळे अर्थबोध होत नाही, म्हणून श्‍लेष अलंकाराने प्रत्येक शब्दाचा दुसरा वास्तविक व लाक्षणिक अर्थ घ्यावा लागतो. असे अर्थ दोन आहेत. एक-यज्ञपरक, दुसरा-शब्द शास्त्रपरक. शिवाय एकूण मंत्रात सांगरुपक अलंकाराचा उपयोग केला आहे. ॥^यज्ञपरक अर्थ- हे मनुष्यानो (हे जाणून घ्यावी (अस्य) या यज्ञाची (त्रय:) (पादा:) प्रात: सवन, मध्यन्दिनसवन आणि सायंसवन हे तीन (पादा:) प्राप्तीची साधने आहेत. या यज्ञाची (चत्वारि) चार वेद (शृड्ग:) शिंगे असून याचे (द्वे) दोन (शीर्षे) उदयकाल आणि अस्तकाल असे दोन शिरे आहेत. (अस्थ) या यज्ञाला (सप्त हस्तास:) गायत्री आदी सात छन्द असे सात हात आहेत. हा यज्ञ (त्रिधा) (बद्ध:) मंत्र, ब्राह्मण आणि कल्प या तीन प्रकारांनी बांधलेला असून (महा) (देव:) महान वा अत्यंत प्राप्तव्य असा (वृषभ:) सर्वथा सर्वत्र सुखाची वृष्टी करणारा यज्ञ (शेरवीति) प्राप्त:काळी मध्यान्ह काळी व सायंकाळी शब्द करीत (मंत्रस्वराद्वारे वातावरण परिपूर्ण करीत) (महर्त्यान्‌) मनुष्यांत (आ विवेश) चांगल्या प्रकारे प्रवेश करतो (मनुष्यांना सुखावतो) म्हणून हे मनुष्यानो, अशा यज्ञाचे अनुष्ठान करून तुम्ही सुखी व्हा. ॥91॥^द्वितीय पत्र (शब्द परक अर्थ) हे मनुष्यानो, (अस्य) या शब्दाचे (त्रय:) (पादा:) भूत, भविष्य आणि वर्तमान असे तीन पाय असून (चत्वारि) शृड्ग:) नाम, आख्यात, उपसर्ग आणि निपात अक्षीचार शिंगे आहेत. शब्दाचे (द्वे) (शीर्षे) नित्य आणि कार्य असे दोन शीर आहेत आणि (अस्य) या शब्दाला (सप्त दृष्टास:) प्रथमा आदी सात विभक्ती रुप सात हात आहेत. असा (हा शब्द) (त्रिधा बद्ध:) हृदय, कंठ आणि शिर या तीन स्थानात बद्ध असतो. (हृदय, कंठ आणि मस्तिष्क शब्दोपत्ती आणि उच्चारणांशी संबंधित हे तीन स्थान आहेत) असा हा (मह:) (देव:) शुद्ध आणि अशुद्ध हे भेद स्पष्ट करणारा (शब्द शुद्ध अथवा अशुद्ध असतो) असा हा (वृषभ:) सुखाची वृष्टी करणारा शब्द वा शब्दशास्त्र (रोखीति) ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थववेद या चार वेदांत गर्जना करीत (मर्त्यान्‌) मनुष्यांमधे अथवा मनुष्यांसाठी (आ विवेश) प्रविष्ट झाला आहे (ईश्‍वराने वेदाच्या रुपाने मानवाला दिला आहे) हे मनुष्यानो, तुम्ही अशा या शब्दशास्त्राचे अध्ययन, अभ्यास करून विद्यावान व्हा. ॥91॥^वरील मंत्रात आलेल्या काही शब्दांविषयी स्पष्टीकरण) सवन = यज्ञ; ब्राह्मण= मंत्र संहितेच्या वेगळा विभाग; कल्प= धार्मिक कर्तव्यांविषयी विधि-विधान, अथवा एक वेदांग ज्यामध्ये यज्ञ, संस्कार आदी विषयीं विधान केलेले आहे; नाम=तो शब्द, ज्याद्वारे एखाद्या व्यक्ती, वस्तू वा समूहाचा बोध होतो; आख्यात=कथित वा प्रसिद्ध शब्द; उपसर्ग=अव्ययशब्द जो संज्ञेच्या आधी येऊन शब्दाचा अर्थ बदलून टाकतो-प्र, परा, अप, सम आदी उपसर्ग; नियात= तो शब्द की जो रणगिम आदीद्वारा कोणत्यातरी रुपात तयार होतो, पण व्याकरणाच्या नियमा (सूत्र) नुसार तयार होत नाही; विभक्ति= सात कारकांचे चिन्ह नामास वा सर्वनामास होणारा विकार की ज्यामुळे शब्दाचा वाक्यातील असलेला संबंध स्पष्ट होतो. ने, ला, चा आदी शब्दाला जोडले जाणारे चिन्ह;
Essence
भावार्थ - या मंत्रात उपयोक्ति आहे म्हणजे उपमानाच्या (उपमा अलंकाराच्या) न्यून वा अधिक अंगाच्या वर्णनाद्वारा रुपक आणि श्‍लेष हे दोन अलंकार आहेत. आशय हा की जो माणूस यज्ञविज्ञा आणि शब्दविद्या या दोन विद्यांचा विशेष अभ्यास करतो, तो महाशय आणि विद्वान होतो ॥91॥
Subject
आता यज्ञाचे गुण आणि शब्दशास्त्रांच्या गुणांविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे –