Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 90

99 Mantra
17/90
Devata- अग्निर्देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- विराडार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
व॒यं नाम॒ प्रं ब्र॑वामा घृ॒तस्या॒स्मिन् य॒ज्ञे धा॑रयामा॒ नमो॑भिः। उप॑ ब्रह्मा॒ शृ॑णवच्छ॒स्यमा॑नं॒ चतुः॑शृङ्गोऽवमीद् गौ॒रऽए॒तत्॥९०॥

व॒यम्। नाम॑। प्र। ब्र॒वा॒म॒। घृ॒तस्य॑। अ॒स्मिन्। य॒ज्ञे। धा॒र॒या॒म॒। नमो॑भिरिति॒ नमः॑ऽभिः। उप॑। ब्र॒ह्मा। शृ॒ण॒व॒त्। श॒स्यमा॑नम्। चतुः॑शृङ्ग॒ इति॒ चतुः॑ऽशृङ्गः। अ॒व॒मी॒त्। गौ॒रः। ए॒तत् ॥९० ॥

Mantra without Swara
वयन्नाम प्र ब्रवामा घृतस्यास्मिन्यज्ञे धारयामा नमोभिः । उप ब्रह्मा शृणवच्छस्यमानञ्चतुः शृङ्गोवमीद्गौरऽएतत् ॥

वयम्। नाम। प्र। ब्रवाम। घृतस्य। अस्मिन्। यज्ञे। धारयाम। नमोभिरिति नमःऽभिः। उप। ब्रह्मा। शृणवत्। शस्यमानम्। चतुःशृङ्ग इति चतुःऽशृङ्गः। अवमीत्। गौरः। एतत्॥९०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (यज्ञ व वेदवाणी ज्याना प्रिय आहे, असे गृहश्रमीजन विद्वानास म्हणत आहेत) आमचे विद्वान असे आहेत की (चतु:श्रृंग:) चार वेद ज्यांच्या चार शिंगाप्रमाणे आहेत आणि जे (गौर:) वेदवाणीमधे रमतात वा वेदज्ञान देतात असे हे (ब्रह्मा) चार वेदाज्ञाता विद्वानांनी आम्हाला (अवमीत्‌) उपदेश करावा आणि (उप, शृणवत्‌) आमच्याजवळ येऊन आम्हाला वेद ऐकावावेत. (त्या विद्वानांकडून ) एकलेले जे (घृतस्म) तुपाचे आणि जलाचे (शस्यमानम्‌) प्रशंसनीय गुप्त (नाम) नाम (गुण वा वैशिष्ट्यें) आहेत, (एतत्‌) ते गुप्त ज्ञान (वयम्‌) आम्ही इतरांना (प्र, ब्रवाम) सांगावे आणि (अस्मिन्‌) या (यज्ञे) गृहाश्रमातील कर्तव्या (नमोभि:) अन्न आदी पदार्थांसह (धारयाम) आम्ही धारण करावे (त्या गुप्त ज्ञानाचा लाभ गृहाश्रमामध्ये घ्यावा) ॥90॥
Essence
भावार्थ - माणासाला हा मनुष्य-देह मिळाला आहे म्हणून त्याने विद्वानाद्वारे जगातील सर्व पदार्थांचे नाम, अर्थ, गुण आदीचे मान मिळविले पाहिजे आणि ते दुसऱ्यांना सांगितले पाहिजे. मनुष्यांनी या सृष्टीच्या सर्व पदार्थांचा योग्य उपयोग करून आपले सर्व कार्य सिद्ध केले पाहिजेत. ॥90॥
Subject
पुन्हा तोच विषय –