Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 9

99 Mantra
17/9
Devata- अग्निर्देवता Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- निचृदार्षी गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
स नः॑ पावक दीदि॒वोऽग्ने दे॒वाँ२ऽइ॒हा व॑ह। उप॑ य॒ज्ञꣳ ह॒विश्च॑ नः॥९॥

सः नः॒। पा॒व॒क॒। दी॒दि॒व इति॑ दीदि॒ऽवः। अग्ने॑। दे॒वान्। इ॒ह। आ। व॒ह॒। उप॑। य॒ज्ञम्। ह॒विः। च॒। नः॒ ॥९ ॥

Mantra without Swara
स नः पावक दीदिवो ग्ने देवाँ इहाऽवह । उप यज्ञँ हविश्च नः ॥

सः नः। पावक। दीदिव इति दीदिऽवः। अग्ने। देवान्। इह। आ। वह। उप। यज्ञम्। हविः। च। नः॥९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (पावक) पवित्र, (दीदिव:) तेजोमय अथवा रिपुदाहक आणि (अग्ने) सत्य-असत्याचे विवेचन व निर्णय करण्यास समर्थ असे हे विद्वान महाशय (स:) आपण वर वर्णन केलेल्या सद्गुणांनी संपन्न आहात. ज्याप्रमाणे हा भैतिक अग्नी (न:) आम्ही हवन केलेल्या उत्तम गुणयुक्त (औषधीयुक्त) (हवि:) हवनीय सुगंधित पदार्थांना प्राप्त करतो (स्वीकारतो) (द्रव्यांना भस्म करून त्यांचे गुण वाढवतो) त्याप्रमाणे (इह) आपणही या जगात (यज्ञम्‌) आमच्या गृहाश्रमरुप यज्ञाला (च) आणि (देवान्‌) त्यातील दिव्य सद्गुणांना व विद्वानांना (न:) आमच्याजवळ (उप, आ, वह) उत्तमप्रकारे आणा. (आमच्या स्वभावात उत्तम गुण येतील व आमच्या घरी विद्वज्जन येतील, असे करा.) ॥9॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे हा अग्नी आपल्या सूर्य आदी रुपाद्वारे (सूर्य अग्नीचाच एक रुप आहे) भूमीवरील सर्व पदार्थांचा रस वर आकाशात घेऊन जातो आणि त्याद्वारे वृष्टीसारखे श्रेष्ठ सुख भूमीला प्रदान करतो, तद्वत विद्वान लोकांनी विद्यारूप रसाचे ग्रहण करून त्यात वृद्धी करून सर्वांसाठी सुख निर्माण करावेत ॥9॥
Subject
पुन्हा तोच विषय पुढील मंत्रात ही कथित आहे –