Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 89

99 Mantra
17/89
Devata- अग्निर्देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- निचृदार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
स॒मु॒द्रादू॒र्मिर्मधु॑माँ॒२ऽउदा॑र॒दुपा॒शुना॒ सम॑मृत॒त्वमा॑नट्। घृ॒तस्य॒ नाम॒ गुह्यं॒ यदस्ति॑ जि॒ह्वा दे॒वाना॑म॒मृत॑स्य॒ नाभिः॑॥८९॥

स॒मु॒द्रात्। ऊ॒र्मिः। मधु॑मा॒निति॒ मधु॑ऽमान्। उत्। आ॒र॒त्। उप॑। अ॒ꣳशुना॑। सम्। अ॒मृ॒त॒त्वमित्य॑मृत॒त्वम्। आ॒न॒ट्। घृ॒तस्य॑ नाम॑। गुह्य॑म्। यत्। अस्ति॑। जि॒ह्वा। दे॒वाना॑म्। अ॒मृत॑स्य। नाभिः॑ ॥८९ ॥

Mantra without Swara
समुद्रादूर्मिर्मधुमाँऽउदारदुपाँशुना सममृतत्वमानट् । घृतस्य नाम गुह्यँयदस्ति जिह्वा देवानाममृतस्य नाभिः ॥

समुद्रात्। ऊर्मिः। मधुमानिति मधुऽमान्। उत्। आरत्। उप। अꣳशुना। सम्। अमृतत्वमित्यमृतत्वम्। आनट्। घृतस्य नाम। गुह्यम्। यत्। अस्ति। जिह्वा। देवानाम्। अमृतस्य। नाभिः॥८९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (समुद्रात्‌) अंतरिक्षापासून (अंशुना) निघणाऱ्या सूर्य किरणांमुळे (मधुमान्‌) मधुरता धारण करून (ऊर्मि:) (भूमीवर आलेली) जी जलतरंग (पुन्हा सूर्य किरणांमुळे) वर अंतरिक्षाकडे जाते, ती (सममृतत्वम्‌) उत्तम अमृतरुप स्वाद घेऊन (उपानट्) या पृथ्वी जवळ यावी. आणि ती तरंग वा ते वृष्टिजल अतीव मधुर व्हावे. (घृतस्य) जलाचे (यत्‌) जे (गुह्यम्‌) गुप्त (नाम) नाव (अस्ति) आहे (पायात जे अज्ञात वा गुप्त गुण आहेत) (त्या गुणांविषयी) (देवानाम्‌) विद्वानांची वा वैज्ञानिकांची वाणी (सांगते) ती वाणी (अमृतस्य) मोक्षाची (नाभि:) व्यवस्था करणारी (मोक्ष देणारी) असते. हे मनुष्यांनो तुम्ही त्या हितकर वाणीचे (आणि जलाचे) सेवन करा ॥89॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो अग्नी मिसळलेल्या भूमी आणि जल यांतून जल वेगळे करतो आणि त्या जलाला मेघमंडळाकडे पाठवून अग्नी त्याला मधुर करतो. (हे तुम्ही जाणून घ्या) तसेच जलांचे जे कारणरुप नाम आहे ते गुप्त आहे (पाण्यातील गुण व वैशिष्ट्ये ‘जल’ या नावांतच दडलेली आहेत) त्या गुणांचे ज्ञान आणि मोक्षप्राप्ती विद्वनांच्या उपदेशानेच प्राप्त होते (वैज्ञानिक पाण्याचे गुण सांगतात आणि विद्वान लोक मोक्षप्राप्तीचे उपाय सांगतात) हे सर्व तुम्ही जाणून घ्या. ॥89॥
Subject
माणसांनी व्यवहार (कार्य वा आचरण) कसे करावे, या विषयी –