Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 84

99 Mantra
17/84
Devata- मरुतो देवताः Rishi- सप्तऋषय ऋषयः Chhand- निचृदार्षी जगती Swara- निषादः
Mantra with Swara
ई॒दृक्षा॑सऽएता॒दृक्षा॑सऽऊ॒ षु णः॑ स॒दृक्षा॑सः॒ प्रति॑सदृक्षास॒ऽएत॑न। मि॒तास॑श्च॒ सम्मि॑तासो नोऽअ॒द्य सभ॑रसो मरुतो य॒ज्ञेऽअ॒स्मिन्॥८४॥

ई॒दृक्षा॑सः। ए॒ता॒दृक्षा॑सः। ऊँ॒ऽइत्यूँ॑। सु। नः॒। स॒दृक्षा॑स॒ इति॑ स॒ऽदृक्षा॑सः। प्रति॑सदृक्षास॒ इति॒ प्रति॑ऽसदृक्षासः। आ। इ॒त॒न॒। मि॒तासः॑। च॒। सम्मि॑तास॒ इति॒ सम्ऽमि॑तासः। नः॒। अ॒द्य। सभ॑रस॒ इति॒ सऽभ॑रसः। म॒रु॒तः॒। य॒ज्ञे। अ॒स्मिन् ॥८४ ॥

Mantra without Swara
ईदृक्षास एतादृक्षासऽऊ षु णः सदृक्षासः प्रतिसदृक्षासऽएतन । मितासश्च सम्मितासो नोऽअद्य सभरसो मरुतो यज्ञे अस्मिन् ॥

ईदृक्षासः। एतादृक्षासः। ऊँऽइत्यूँ। सु। नः। सदृक्षास इति सऽदृक्षासः। प्रतिसदृक्षास इति प्रतिऽसदृक्षासः। आ। इतन। मितासः। च। सम्मितास इति सम्ऽमितासः। नः। अद्य। सभरस इति सऽभरसः। मरुतः। यज्ञे। अस्मिन्॥८४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सामान्यजन म्हणतात) हे (मकत:) प्रत्येक ऋतूत यज्ञ करण्याऱ्या विद्वज्जनहो, आपण (ईहक्षार:) या या सद्गुणांनी संपन्न असून (एताहक्षास:) त्या सद्गुणांसारखेच अन्य जे श्रेष्ठ गुण आहेत, (त्यांना धारण करीत असून) आपण (सहक्षास:) पक्षपात करणे सोडून सर्वांना समदृष्टीने पाहणारे आहात. तसेच आपण (प्रति-सट्टक्षास:) शास्त्रवेत्ता, शास्त्र अध्येता, सत्यवक्ता आणि धर्मात्मा जनांसमान आहात म्हणून आपण (न:) आम्हा सामान्यजनांसाठी (सु. आ, तन) आनंदाने प्राप्त व्हा. (आम्हाला शास्त्र सत्यज्ञान द्या. सर्वांना समान माना) (उ) तसेच आपण (मितास:) संयमी व मितकामी असून (संमितास:) तुलेप्रमाणे सत्य आणि असत्य यांना वेगळे करणारे आहात (अस्मिन्‌) अधिक हीन वा श्रेष्ठ असा भेद दाखविणारे आहात) (च) आणि आपण (अस्मिन्‌) या यज्ञामधे (सभरस:) आमच्यासारख्या सर्व लोकांना पोषण वा समर्थन देणारे व्हा. असे आपण (अद्य) आज (ना:) आमची रक्षा करा. तसेच आम्ही सामान्यजनांनी देखील आपल्यासारख्या विद्वानांचा सत्कार-गौरव केला पाहिजे ॥84॥
Essence
भावार्थ - धर्मिक विद्वान जिथे व जेव्हां भेटतील, बुद्धिमान जनांनी त्याच्यापासून शिकावे. तसेच विद्वान जिथे जातील, ज्यांना ज्यांणा भेटतील, त्यांना चांगले ते शिकविले पाहिजे, शिकवण दिली पाहिजे. असेच विद्वान सर्व सामान्य जनांकडून सत्कार व गौरवास पात्र ठरतात ॥84॥
Subject
पुनश्‍च, तोच विषय –