Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 83

99 Mantra
17/83
Devata- मरुतो देवताः Rishi- सप्तऋषय ऋषयः Chhand- भुरिगार्ष्युष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
ऋ॒त॒जिच्च॑ सत्य॒जिच्च॑ सेन॒जिच्च॑ सु॒षेण॑श्च। अन्ति॑मित्रश्च दू॒रेऽअ॑मित्रश्च ग॒णः॥८३॥

ऋ॒त॒जिदित्यृ॑त॒ऽजित्। च॒। स॒त्यजिदिति॑ सत्य॒ऽजित्। च॒। से॒न॒जिदिति॑ सेन॒ऽजित्। च॒। सु॒षेणः॑। सु॒सेन॒ इति॑ सु॒ऽसेनः॑। च॒। अन्ति॑मित्र॒ इत्यन्ति॑ऽमित्रः। च॒। दू॒रेऽअ॑मित्र॒ इति॑ दू॒रेऽअ॑मित्रः। च॒। ग॒णः ॥८३ ॥

Mantra without Swara
ऋतजिच्च सत्यजिच्च सेनजिच्च सुषेणश्च । अन्तिमित्रश्च दूरेअमित्रश्च गणः ॥

ऋतजिदित्यृतऽजित्। च। सत्यजिदिति सत्यऽजित्। च। सेनजिदिति सेनऽजित्। च। सुषेणः। सुसेन इति सुऽसेनः। च। अन्तिमित्र इत्यन्तिऽमित्रः। च। दूरेऽअमित्र इति दूरेऽअमित्रः। च। गणः॥८३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जो माणूस (ऋतजित्‌) ज्ञानाची विशेष वृद्धी करणारा (संशोधक, वैज्ञानिक) (च) आणि (सत्यजित्‌) सत्य, ??कारण आणि धर्म यांना उन्नती देणारा (सत्यधर्माचा प्रचार-प्रकार करणारा) आहे, (च) आणि जो (सेनजित्‌) शत्रुसैन्याला (आपल्या रणनीती व योजनांद्वारे) जिंकणारा (च) आणि (सुषेण:) चांगले सैन्य बाळगणारा आहे (च) तसेच जो (अन्तिमित्र:) जवळ राहून नेहमी मित्रवत्‌ सहाय्य करणारा (च) आणि (दूरे अमित्र:) ज्यास पाहून शत्रू दूर पळतात, असा आहे (च) (याशिवाय) जो माणूस याच प्रकारे अन्य सद्गुण धारण करणारा आहे, तोच (गण:) गणनीय वा गणमान्य होतो. ॥83॥
Essence
भावार्थ - जी माणसें विद्या आणि सत्य प्रसार आदी कार्यांना प्रोत्साहन देतात सत्कार्मांची करतात, तसेच मित्रांची सेवा व शत्रूंशी वैर करतात, तीच माणसे या लोकीं प्रशंसनीय ठरतात. ॥83॥
Subject
आता या पुढील मंत्रात, विद्वानांनी कसे असावे, याविषयी –