Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 80

99 Mantra
17/80
Devata- मरुतो देवताः Rishi- सप्तऋषय ऋषयः Chhand- आर्ष्युष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
शु॒क्रज्यो॑तिश्च चि॒त्रज्यो॑तिश्च स॒त्यज्योति॑श्च॒ ज्योति॑ष्माँश्च। शु॒क्रश्च॑ऽऋत॒पाश्चात्य॑ꣳहाः॥८०॥

शु॒क्रज्यो॑ति॒रिति॑ शु॒क्रऽज्यो॑तिः। च॒। चि॒त्रज्यो॑ति॒रिति॑ चि॒त्रऽज्यो॑तिः। च॒। स॒त्यज्यो॑ति॒रिति॑ स॒त्यऽज्यो॑तिः। च॒। ज्योति॑ष्मान्। च॒। शु॒क्रः। च॒। ऋ॒त॒पा इत्यृ॑त॒ऽपाः। च॒। अत्य॑ꣳहा॒ इत्यति॑ऽअꣳहाः ॥८० ॥

Mantra without Swara
शुक्रज्योतिश्च चित्रज्योतिश्च सत्यज्योतिश्च ज्योतिष्माँश्च । शुक्रश्चऽऋतपाश्चात्यँहाः ॥

शुक्रज्योतिरिति शुक्रऽज्योतिः। च। चित्रज्योतिरिति चित्रऽज्योतिः। च। सत्यज्योतिरिति सत्यऽज्योतिः। च। ज्योतिष्मान्। च। शुक्रः। च। ऋतपा इत्यृतऽपाः। च। अत्यꣳहा इत्यतिऽअꣳहाः॥८०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, तो परमेश्‍वर (शुक्रज्योति:) शुद्ध प्रकाश (शुद्धस्वरूप) आहे (च) आणि (चित्रज्योति:) अद्भुतस्वरूप आहे (च) आणि तो (सत्यज्योति:) अविनाशी प्रकाश असणारा (म्हणजे स्वरूप वा कीर्ती असणारा) आहे. (च) आणि (ज्योतिष्मान्‌) अनंत प्रकाशमान आहे (सूर्यचंद्रादी त्याने दिलेल्या प्रकाशामुळे प्रकाशिथ आहेत) (च) आणि तो (शुक्र:) शीघ्रकारी अथवा शुद्ध स्वरूप आहे (च) आणि (अत्यंहा) दुष्ट कर्मांचा विनाश करणारा (दुष्टांचा संहारक) आहे (च) आणि (ऋतपा:) सत्याचे (निसर्गाच्या व त्याने केलेल्या नियमांचे) रक्षण करणारा आहे (त्याने केलेल्या नियमांचा भग वा परिवर्तन कोणी करू शकत नाही.) हे मनुष्यांनो, तुम्ही देखील त्याप्रमाणे (सत्यपालक कीर्तिमान व शुद्धाचारी) व्हा. ॥80॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे परमेश्‍वराने या जगात विद्युत आणि सूर्यासारखे प्रकाश देणारे, शुद्ध करणारे पदार्थ निर्माण करून या जगाला शुद्ध केले आहे, त्याप्रमाणे विद्वज्जनांनी शुद्ध व्यवहार, सत्य प्रसार करून आणि विद्योपदेश देऊन सर्व मनुष्यांना शुद्ध केला आहे. यावरून सूचित होते की, विद्वज्जनांनी सर्वांवर प्रीती करणे आदी गणदेखील अंगीकारले पाहिजेत ॥80॥
Subject
आता या मंत्रात ईश्‍वराचे स्वरूप प्रतिपादित केले आहे –