Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 75

99 Mantra
17/75
Devata- अग्निर्देवता Rishi- गृत्समद ऋषिः Chhand- आर्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
वि॒धेम॑ ते पर॒मे जन्म॑न्नग्ने वि॒धेम॒ स्तोमै॒रव॑रे स॒धस्थे॑। यस्मा॒द् योने॑रु॒दारि॑था॒ यजे॒ तं प्र त्वे ह॒वीषि॑ जुहुरे॒ समि॑द्धे॥७५॥

वि॒धेम॑। ते॒। प॒र॒मे। जन्म॑न्। अ॒ग्ने॒। वि॒धेम॑। स्तोमैः॑। अव॑रे। स॒धस्थ॒ इति॑ स॒धऽस्थे॑। यस्मा॑त्। योनेः॑। उ॒दारि॒थेत्यु॒त्ऽआरि॑थ। यजे॑। तम्। प्र। त्व इति॒ त्वे। ह॒वीषि॑। जु॒हु॒रे॒। समि॑द्ध॒ इति॒ सम्ऽइ॑द्धे ॥७५ ॥

Mantra without Swara
विधेम ते परमे जन्मन्नग्ने विधेम स्तोमैरवरे सधस्थे । यस्माद्योनेरुदारिथा यजे तम्प्र त्वे हवीँषि जुहुरे समिद्धे ॥

विधेम। ते। परमे। जन्मन्। अग्ने। विधेम। स्तोमैः। अवरे। सधस्थ इति सधऽस्थे। यस्मात्। योनेः। उदारिथेत्युत्ऽआरिथ। यजे। तम्। प्र। त्व इति त्वे। हवीषि। जुहुरे। समिद्ध इति सम्ऽइद्धे॥७५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) तेजस्वी योगी, (ते) आपल्या (परमे) अत्युत्तम योगाच्या संस्कारामुळे उत्पन्न (जन्मन्‌) पूर्व जन्मात तसेच (त्वे) आपल्या या वर्तमान जन्मात (अवरे) वा नंतरच्या जन्मात (सधस्ये) आम्ही व आपण एका स्थानात राहून, (अशी इच्छा करतो की जन्मोजन्मी आम्हा सामान्यजनांना आपला सहवास लाभावा) आणि आम्ही सर्व जन्मी (स्तेमै:) स्तुतीद्वारा (विधेम) आपला सत्कार करीत आपली सेवा करीत राहू, ही इच्छा आहे (यस्मात्‌) या कारणांमुळे (योने:) स्थानापासून (आपल्या घरापासून) (उदारिथ) उत्तमोत्तम साधन प्राप्त करीत मी (तम्‌) त्या स्थानाला (तुमच्या योगविद्यालयाला) (प्र, पणे) अवश्‍य प्राप्त करावे. तसेच, ज्याप्रमाणे होम करणारे लोक (समिद्धे) चांगल्याप्रकारे प्रज्वलित आगीत (हवींषि) हवनीय पदार्थांचा (जुहरे) होम करतात तद्वत आम्ही (सामाज्य जनांनी) आपलेल्या सर्व दु:खांना योगाग्नीद्वारे (विद्येम) भस्म करून टाकावे. ॥75॥
Essence
भावार्थ - योगाचे संस्कार असलेला जो जीव या जागात पवित्र असा जन्म घेतो, तो त्या प्रवर्क संस्कारांच्या प्रभावामुळे पुन्हा योग शिकण्याकडेच उयुक्त होतो. तसेच जे या योगाचे सेवन करतात (अनुभवसिद्ध योगी असतात) ते देखील योगाची (अधिक सिद्धी प्राप्त करण्याची) कामना करतात. वरील प्रकारातील सर्व योगी आपल्या समस्त दु:खांना व अशुद्ध भावांना, ज्याप्रमाणे अग्नी लाकडाला जळतो, तद्वत ते योगी आपले सर्व दु:ख व अशुद्ध भाव भस्म करून टाकतात ॥75॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय –