Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 72

99 Mantra
17/72
Devata- अग्निर्देवता Rishi- कुत्स ऋषिः Chhand- निचृदार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
सु॒प॒र्णोऽसि ग॒रुत्मा॑न् पृ॒ष्ठे पृ॑थि॒व्याः सी॑द। भा॒सान्तरि॑क्ष॒मापृ॑ण॒ ज्योति॑षा॒ दिव॒मुत्त॑भान॒ तेज॑सा॒ दिश॒ऽउद्दृ॑ꣳह॥७२॥

सु॒प॒र्णः। अ॒सि॒। ग॒रुत्मा॒निति॑ ग॒रुत्मा॑न्। पृ॒ष्ठे। पृ॒थि॒व्याः। सी॒द॒। भा॒सा। अ॒न्तरि॑क्षम्। आ। पृ॒ण॒। ज्योति॑षा। दिव॑म्। उत्। स्त॒भा॒न॒। तेज॑सा। दिशः॑। उत्। दृ॒ꣳह॒ ॥७२ ॥

Mantra without Swara
सुपर्णासि गरुन्मान्पृष्ठे पृथिव्याः सीद । भासान्तरिक्षमापृण ज्योतिषा दिवमुत्तभान तेजसा दिशऽउद्दृँह ॥

सुपर्णः। असि। गरुत्मानिति गरुत्मान्। पृष्ठे। पृथिव्याः। सीद। भासा। अन्तरिक्षम्। आ। पृण। ज्योतिषा। दिवम्। उत्। स्तभान। तेजसा। दिशः। उत्। दृꣳह॥७२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान योगी, आपण आपल्या (भासा) योगजन्य प्रकाशाद्वारे (सुपर्ण:) उत्तम व पूर्ण शुभ लक्षणांनी युक्त आहात. आणि (गरुत्मान्‌) मानसिक व आत्मिक बलाने अत्यंत समृद्ध (असि) आहात. अत्यंत प्रकाशमान अशा आकाशात विद्यमान सूर्याप्रमाणे आपण (पृधिव्या:) (पृष्ठे) या भूतलावर (सीद) स्थित आहात (म्हणजे आकाशात जसा सूर्य तसा आपला संचार पूर्ण भूतलावर आहे व होऊ शकतो) अथवा आपण वायूप्रमाणे सर्व लोकांना (आ पृण) सुख-आनंदाने भरून टाका. तसेच ज्याप्रमाणे सूर्य (ज्योतिषा) आपल्या प्रकाशाने (दिवम्‌) प्रकाशमय (अन्तरिक्षम्‌) अंतरिक्षाला व्यापून टाकतो, तद्वत आपल्या राजनीतीतील ज्ञानाने (उत्‌ स्तभाव) राज्याला उन्नत करा. अथवा ज्याप्रमाणे अग्नी आपल्या (तेजसा) अति तीव्र तेजाने सर्व (दिश:) दिशा उजळून टाकतो, तद्वत आपण आपल्या योगप्रकाशाने (उद्‌ दृंह) सर्वांना उन्नत वा प्रगत करा. ॥72॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जेव्हां माणूस राग अर्थात प्राती तसेच द्वेष आणि वैरभाव यांचा त्याग करून ईश्‍वराप्रमाणे सर्वांवर उपकार करीत सर्व प्राण्यांशी आत्मीयतेने वागतो, तेव्हाच तो योगाच्या सिद्धि प्राप्त करू शकतो. ॥72॥
Subject
पुनश्‍च, तो विद्वान योगी कसा असावा, याविषयी –