Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 71

99 Mantra
17/71
Devata- अग्निर्देवता Rishi- कुत्स ऋषिः Chhand- भुरिगार्षी पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
अग्ने॑ सहस्राक्ष शतमूर्द्धञ्छ॒तं ते॑ प्रा॒णाः स॒हस्रं॑ व्या॒नाः। त्वꣳ सा॑ह॒स्रस्य॑ रा॒यऽई॑शिषे॒ तस्मै॑ ते विधेम॒ वाजा॑य॒ स्वाहा॑॥७१॥

अग्ने॑। स॒ह॒स्रा॒क्षेति॑ सहस्रऽअक्ष। श॒त॒मू॒र्द्ध॒न्निति॑ शतऽमूर्धन्। श॒तम्। ते॒। प्रा॒णाः। स॒हस्र॑म्। व्या॒ना इति॑ विऽआ॒नाः। त्वम्। सा॒ह॒स्रस्य॑। रा॒यः। ई॒शि॒षे॒। तस्मै॑। ते॒। वि॒धे॒म॒। वाजा॑य। स्वाहा॑ ॥७१ ॥

Mantra without Swara
अग्ने सहस्राक्ष शतमूर्धञ्छतन्ते प्राणाः सहस्रँव्यानाः । त्वँ साहस्रस्य राय ईशिषे तस्मै ते विधेम वाजाय स्वाहा ॥

अग्ने। सहस्राक्षेति सहस्रऽअक्ष। शतमूर्द्धन्निति शतऽमूर्धन्। शतम्। ते। प्राणाः। सहस्रम्। व्याना इति विऽआनाः। त्वम्। साहस्रस्य। रायः। ईशिषे। तस्मै। ते। विधेम। वाजाय। स्वाहा॥७१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (सहस्राक्ष) हजारो व्यवहारांमधे (भोवती होणाऱ्या सर्व घटनांवर) एकाच वेळी लक्ष ठेवून शकणाऱ्या अथवा त्या सर्व व्यवहारांचे विशेष ज्ञान असणाऱ्या योगिराज, तसेच (शत मूर्द्धन्‌) शेकडों प्राण्यांच्या बुद्धीत प्रवेश करणाऱ्या (एकाच वेळी शेकडो व्यक्तीच्या बुद्धीतील विचार जाणू शकणाऱ्या (अग्ने) अग्नीप्रमाणे तेजस्वी हे योगिराज) (ते) आपले (शतम्‌) शेकडो (प्राणा:) जीवनाचे साधन असलेले प्राण आणि (सहस्रम्‌) (व्याना:) शरीरात सर्व क्रिया घडणाचे कारण जो वायू (यांचे तुम्ही स्वामी आहात) तसेच (त्वम्‌) आपण (साहस्रस्थ) हजारो जीवांचा आणि पदार्थांचा आधार असलेल्या या जगातील (राय:) धनाचे (ईशिषे) स्वामी आहात. (तस्मै) अशा त्या (वाजाय) विशेष ज्ञानाचे अधिपती जे आपण, (ते) त्या आपणाला आम्ही (सर्व जिज्ञासूजन) (स्वाहा) सत्य वाणीद्वारे (प्रशंसा व महिमामान करीत) विधेम) आपला सत्कार करतो व आपल्याजवळ येतो. ॥71॥
Essence
भावार्थ - जो योगी पुरुष तप, स्वाध्याय आणि ईश्‍वर प्राणिधाम आदी (यम-नियमादी) योगसाधनांद्वारे योग (म्हणजे धारण, ध्यान, समाधि, संयम) आदींच्या शक्तीद्वारा योगसिद्धी प्राप्त करतो, तो अनेक प्राण्यांच्या शरीरात प्रविष्ट होऊन त्यांच्या अनेक शिर, नेत्र आदी अवयवांद्वारे पाहणे (बोलणे, विचार करणे) आदी कार्य करू शकतो. तसेच तो अनेक पदार्थांचा वा धनांचा स्वामीदेखील होऊ शकतो. आम्ही (इतर लोकांनी) अशा सिद्ध योगी पुरुषाजवळ अवश्‍य जावे. ॥71॥
Subject
यानंतर योगीजनांच्या कर्मकलांविषयी उपदेश –