Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 70

99 Mantra
17/70
Devata- अग्निर्देवता Rishi- कुत्स ऋषिः Chhand- आर्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
नक्तो॒षासा॒ सम॑नसा॒ विरू॑पे धा॒पये॑ते॒ शिशु॒मेक॑ꣳ समी॒ची। द्यावा॒क्षामा॑ रु॒क्मोऽअ॒न्तर्विभा॑ति दे॒वाऽअ॒ग्निं॑ धा॑रयन् द्रविणो॒दाः॥७०॥

नक्तो॒षासा॑। नक्तो॒षसेति॒ नक्तो॒षसा॑। सम॑न॒सेति॒ सऽम॑नसा। विरू॑पे॒ इति॒ विऽरू॑पे। धा॒पये॑ते॒ इति॑ धा॒पये॑ते। शिशु॑म्। एक॑म्। स॒मी॒ची इति॑ सम्ऽई॒ची। द्यावा॒क्षामा॑। रु॒क्मः। अ॒न्तः। वि। भा॒ति॒। दे॒वाः। अ॒ग्निम्। धा॒र॒य॒न्। द्र॒वि॒णो॒दा इति॑ द्रविणः॒ऽदाः ॥७० ॥

Mantra without Swara
नक्तोषासा समनसा विरूपे धापयेते शिशुमेकँ समीची । द्यावाक्षामा रुक्मोऽअन्तर्विभाति देवाऽअग्निं धारयन्द्रविणोदाः ॥

नक्तोषासा। नक्तोषसेति नक्तोषसा। समनसेति सऽमनसा। विरूपे इति विऽरूपे। धापयेते इति धापयेते। शिशुम्। एकम्। समीची इति सम्ऽईची। द्यावाक्षामा। रुक्मः। अन्तः। वि। भाति। देवाः। अग्निम्। धारयन्। द्रविणोदा इति द्रविणःऽदाः॥७०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, ज्याप्रमाणे (समनसा) एकसमान ज्ञानी (अनुभवी) (समीची) एकच उद्देश्‍य असणाऱ्या (विरूपे) भिन्न रूप असलेल्या दाई आणि जन्मदायी माता (एकम्‌) एकच (शिशुम्‌) शिशुला दूध पाजवितात, त्याप्रमाणे (नक्तोषसा) रात्रि आणि उष:काल या जगाला दूध पाजवितात. म्हणजे अत्यंत आनंदित करतात. तसेच (रुक्म:) प्रकाशमान अग्नी (द्यावक्षामा अन्त:) या ब्रह्मांडाला (वि भाति) विशेषत्वाने प्रकाशित करतो, त्याच (अग्निम्‌) अग्नीला (द्रविणोदा:) द्रव्य देणारे (दानशील) (देवा:) शास्त्रव्रेत्ताजन (धारयन्‌) धारण करतात. (हे मनुष्यानो) तुम्ही देखील त्याच्याप्रमाणे करीत जा ॥70॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे या संसारात रात्र आणि प्रात: काळ या दोन वेळा वेगळ्या रुपाने विद्यमान असून लोकोपकारक आहेत, तसेच ज्याप्रमाणे विद्युत आणि अग्नी सर्व पदार्थात व्याप्त असूनही (त्या दोन्ही शक्ती एकाच पदार्थात एकत्र असूनही) सहनशील असतात अथवा प्रकाश व भूमी ज्याप्रमाणे एकमेकास पूरक व सहनशील आहेत, मनुष्यांनी देखील (त्याप्रमाणे एकत्वभावनेने) वागले पाहिजे. सर्वांनी अत्यंत विवेकाने आणि शुभगुणयुक्त आचरण ठेवावे आणि पिता जसा पुत्राचे पालन करतो, तेवढ्या प्रेमाने जगाचे पालन करावे (सर्वांशी प्रेमाने वागावे) ॥70॥
Subject
मनुष्यांनी कसे वर्तावे, याविषयी –