Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 7

99 Mantra
17/7
Devata- अग्निर्देवता Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- आर्षी बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
अ॒पामि॒दं न्यय॑नꣳ समु॒द्रस्य॑ नि॒वेश॑नम्। अ॒न्याँस्ते॑ऽअ॒स्मत्त॑पन्तु हे॒तयः॑ पाव॒कोऽअ॒स्मभ्य॑ꣳ शि॒वो भ॑व॥७॥

अ॒पाम्। इ॒दम्। न्यय॑न॒मिति॑ नि॒ऽअय॑नम्। स॒मु॒द्रस्य॑। नि॒वेश॑न॒मिति॑ नि॒ऽवेश॑नम्। अ॒न्यान्। ते॒। अ॒स्मत्। त॒प॒न्तु॒। हे॒तयः॑। पा॒व॒कः। अ॒स्मभ्य॑म्। शि॒वः। भ॒व॒ ॥७ ॥

Mantra without Swara
अपामिदन्न्ययनँ समुद्रस्य निवेशनम् अन्याँस्तेऽअस्मत्तपन्तु हेतयः पावकोऽअस्मभ्यँ शिवो भव ॥

अपाम्। इदम्। न्ययनमिति निऽअयनम्। समुद्रस्य। निवेशनमिति निऽवेशनम्। अन्यान्। ते। अस्मत्। तपन्तु। हेतयः। पावकः। अस्मभ्यम्। शिवः। भव॥७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (गृहाश्रमी व्यक्तींचे वचन) हे विद्वान महोदय, (इदम्‌) हा आकाश (अपाम्‌) जलाचे तसेच प्राणांचे (न्ययनम्‌) निश्‍चित स्थान आहे (प्राण, जल व भूमीचा आधार आकाश आहे) त्या आकाशात जो (समुद्रस्य) समुद्र (वा जलसमूह) आहे, त्याच्या (निवेशनम्‌) स्थितीप्रमाणे तुम्ही आमच्या गृहाश्रमाला प्राप्त व्हा. आपण (पावक:) पवित्र कर्म करणारे आहात त्यामुळे (अस्मभ्यम्‌) आमच्यासाठी देखील (शिव:) कल्याणकारी (भव) व्हा. (ते) आपले वज्र (वा वाक्‌ प्रहार) (अस्मत्‌) आम्हा सज्जनांकरिता असू नये, तर (अन्यान्‌) आमच्याहून जे वेगळे दुष्ट-दुर्जन आहेत, त्यांना तुमचे (कटुवचन वा धिक्कार) त्रासदायक ठरोत ॥7॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जसा जलाचा आधार समुद्र आहे, समुद्राचा आधार भूमी आहे आणि भूमीचा आधार आकाश आहे, त्याप्रमाणे गृह हे गृहस्थांचा आधार आहे. गृहस्थांनी आपल्या घराला मंगलमय आचरणाद्वारे श्रेष्ठ बनवावे. त्याद्वारे श्रेष्ठजनांचे पालन-रक्षण करावे आणि दरोडेखोर-लुटारु यांना बंधनात टाकावे ॥7॥
Subject
गृहस्थाचे कर्तव्य काय, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -