Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 68

99 Mantra
17/68
Devata- अग्निर्देवता Rishi- विधृतिर्ऋषिः Chhand- निचृदार्ष्यनुस्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
स्व॒र्यन्तो॒ नापे॑क्षन्त॒ऽआ द्या रो॑हन्ति॒ रोद॑सी। य॒ज्ञं ये वि॒श्वतो॑धार॒ꣳ सुवि॑द्वासो वितेनि॒रे॥६८॥

स्वः॑। यन्तः॑। न। अप॑। ई॒क्ष॒न्ते॒। आ। द्याम्। रो॒ह॒न्ति॒। रोद॑सी॒ इति॒ रोद॑सी। य॒ज्ञम्। ये। वि॒श्वतो॑धार॒मिति॑ वि॒श्वतः॑ऽधारम्। सुवि॑द्वास॒ इति॒ सुवि॑द्वासः। वि॒ते॒नि॒र इति॑ विऽतेनि॒रे ॥६८ ॥

Mantra without Swara
स्वर्यन्तो नापेक्षन्त आ द्याँ रोहन्ति रोदसी । यज्ञँये विश्वतोधारँ सुविद्वाँसो वितेनिरे ॥

स्वः। यन्तः। न। अप। ईक्षन्ते। आ। द्याम्। रोहन्ति। रोदसी इति रोदसी। यज्ञम्। ये। विश्वतोधारमिति विश्वतःऽधारम्। सुविद्वास इति सुविद्वासः। वितेनिर इति विऽतेनिरे॥६८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (ये) जे (सुविद्वांस:) उत्तम चांगले तज्ञ योगी (यन्त:) योगाभ्यासातील पूर्ण नियमांचे पालन करणाऱ्या (पूर्वी झालेल्या योगीजना) (न) प्रमाणे (स्व:) (योगाभ्यासाद्वारे अत्यंत सुख (अप, ईक्षते) प्राप्त करण्याची इच्छा करतात अथवा (रोदसी) आकाळाकडे (आ, रोहन्ति) उंच जातात वा पृथ्वीवर सर्वत्र संचार करतात म्हणजे इच्छा होईल, त्याप्रमाणे लोकलोकांतरापर्यंत जातात ते अविनाशी सुख प्राप्त करतात) तसेच ते योगपंडित (द्याम्‌) योगविद्येचा आणि (विश्‍वतोधारम्‌) सर्वदृष्ट्या उपयुक्त वाणीचा (मंत्राचा) उद्यारण होत असलेल्या (यज्ञम्‌) यज्ञादीकर्मचा (वितेनिरे) विस्तार करतात (वेदज्ञानाचा प्रसार आणि यज्ञादी श्रेष्ठकर्माचे आयोजन करतात) तेच अनंत सुख प्राप्त करतात ॥68॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. जसे एक सारथी घोड्यांना चांगले प्रशिक्षण देऊन त्यांना योग्य त्या रस्त्यावरून नेत अभिष्ट स्थानाला जातो, तद्वत चांगले तज्ञ योगी जितेंद्रिय होऊन नियमांचे पालन करीत आपल्या अभीष्ट देवाला, परमेश्‍वराला प्राप्त करून परम आनंद अनुभवतात. ॥68॥
Subject
पुढील मंत्रातही तोच विषय -