Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 67

99 Mantra
17/67
Devata- अग्नि देवता Rishi- विधृतिर्ऋषिः Chhand- पिपीलिकामध्या बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
पृ॒थि॒व्याऽअ॒हमुद॒न्तरि॑क्ष॒मारु॑हम॒न्तरि॑क्षा॒द् दिव॒मारु॑हम्। दि॒वो नाक॑स्य पृ॒ष्ठात् स्वर्ज्योति॑रगाम॒हम्॥६७॥

पृ॒थि॒व्याः। अ॒हम्। उत्। अ॒न्तरि॑क्षम्। आ। अ॒रु॒ह॒म्। अ॒न्तरि॑क्षात्। दिव॑म्। आ। अ॒रु॒ह॒म्। दि॒वः। नाक॑स्य। पृ॒ष्ठात्। स्वः॑। ज्योतिः॑। अ॒गा॒म्। अ॒हम् ॥६७ ॥

Mantra without Swara
पृथिव्याऽअहमुदन्तरिक्षमारुहमन्तरिक्षाद्दिवमारुहम् । दिवो नाकस्य पृष्ठात्स्वर्ज्यातिरगामहम् ॥

पृथिव्याः। अहम्। उत्। अन्तरिक्षम्। आ। अरुहम्। अन्तरिक्षात्। दिवम्। आ। अरुहम्। दिवः। नाकस्य। पृष्ठात्। स्वः। ज्योतिः। अगाम्। अहम्॥६७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (एक सिद्धयोगी म्हणत आहे) हे मनुष्यानो, ज्याप्रमाणे (अहम्‌) मी योगाच्या आठ अंगाचे अनुष्ठान करून संयमी सिद्ध झालो आहे, म्हणजे धारण, ध्यान आणि समाधी क्रियेत परिपूर्ण झालो आहे त्याप्रमाणे तुम्ही करण्याचे यत्न करा) मी (पृथिव्या:) पृथ्वीवरून (अन्तरिक्षम्‌) आकाशाकडे (उद, आ, आरुहम्‌) वर वर जाऊ शकतो अथवा (अन्तरिक्षात) आकाशावरून (दिवम्‌) प्रकाशमान उंच सूर्यलोकात (आ, अरूहम्‌) जातो आणि (नाकस्य) सुखदायक (दिव:) प्रकाशमान सूर्यलोकाच्या (पृष्ठात) जवळ जाऊन (स्व:) अत्यंत सुख आणि (ज्योति:) ज्ञानाचा प्रकाश (अहम्‌) मी (अगाम्‌) प्राप्त करतो, तद्वत तुम्ही देखील करा (माझ्या रीतीने तुम्ही देखील समाधी अवस्थेतील सुख अनुभवू शकाल) ॥67॥
Essence
भावार्थ - जेव्हा माणूस (वा एक योगी आपल्या आत्म्याचा परमात्म्याशी योग घडवून आणतो, तेव्हा त्यास आणिमा आदी योगसिद्धी प्राप्त होतात. त्यानंतर योगी कुठेही न थांबता अबाधगतीने इच्छित स्थलापर्यंत जाऊ शकतो. मनुष्याने जर योग्याप्रमाणे न केले, तर तो कदापी त्या स्थानांपर्यंत जाऊ शकत नाही. ॥67॥
Subject
पुढील मंत्रात योगीजनांच्या गुणांविषयी उपदेश केला आहे-