Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 65

99 Mantra
17/65
Devata- अग्निर्देवता Rishi- विधृतिर्ऋषिः Chhand- निचृदार्ष्यनुस्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
क्रम॑ध्वम॒ग्निना॒ नाक॒मुख्य॒ꣳ हस्ते॑षु॒ बिभ्र॑तः। दि॒वस्पृ॒ष्ठ स्व॑र्ग॒त्वा मि॒श्रा दे॒वेभि॑राध्वम्॥६५॥

क्रमध्वम्। अ॒ग्निना॑। नाक॑म्। उख्य॑म्। हस्ते॑षु। बिभ्र॑तः। दि॒वः। पृ॒ष्ठम्। स्वः॑। ग॒त्वा। मि॒श्राः। दे॒वेभिः॑। आ॒ध्व॒म् ॥६५ ॥

Mantra without Swara
क्रमध्वमग्निना नाकमुख्यँ हस्तेषु बिभ्रतः । दिवस्पृष्ठँ स्वर्गत्वा मिश्रा देवेभिराध्वम् ॥

क्रमध्वम्। अग्निना। नाकम्। उख्यम्। हस्तेषु। बिभ्रतः। दिवः। पृष्ठम्। स्वः। गत्वा। मिश्राः। देवेभिः। आध्वम्॥६५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सेनापती सैनिकास) हे माझ्या वीरांनो, तुम्ही (अग्निना) विद्युतशक्तीद्वारे (नाकम्‌) सुख आणि (योग्य व आवश्‍यक उपयोग अवश्‍य घ्या) आणि (उख्यम्‌) ऊखळात कुटले वा पात्रात शिजविलेले भात, भाजी, कढी आदी पदार्थांचे पौष्टिक भोजन (हस्तेषु) आपल्या हातात (विभ्रत:) धारण करून (क्रमध्वम्‌) युद्धक्षेत्रात पराक्रम गाजवा (सैनिकांनी युद्धक्षेत्रात जेवण, स्नान आदी दैनंदिन कार्यक्रम प्राप्त प्रसंगाप्रमाणे पूर्ण करून घेतले पाहिजेत) कधी उभे राहूनच अथवा धावतच जेवण करावे लागते, तर करावे) तसेच हे सैनिकहो, तुम्ही (देवेभि:) विद्वानांकडून (मिश्रा:) प्राप्त होणारे मार्गदर्शन (दिव:) न्याय्य व उचित रीतीने पाळावे आणि अशाप्रकारे (पृष्ठम्‌) तुम्हाला इच्छित असलेले (स्व:) सुख (मत्वा) प्राप्त करून तुम्ही (आध्वम्‌) इथे स्थित व्हा. ॥65॥
Essence
भावार्थ - राजपुरुषांनी (राजा, सैन्याधिकारी कर्मचारी) या सर्वांनी विद्वज्जनांशी (अभियांत्रिकजन, वैज्ञानिक, तंत्रज्ञ, आदी लोकांशी) संपर्क ठेवून आग्नेय आदी अस्त्रांद्वारे शत्रूंचा पराभव करावा आणि त्याद्वारे स्थायी सुख-समाधान मिळविण्याचे प्रयत्न वारंवार करावेत. ॥65॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय-