Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 62

99 Mantra
17/62
Devata- यज्ञो देवता Rishi- विधृतिर्ऋषिः Chhand- निचृदार्ष्यनुस्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
दे॒व॒हूर्य॒ज्ञऽआ च॑ वक्षत् सुम्न॒हूर्य॒ज्ञऽआ च॑ वक्षत्। यक्ष॑द॒ग्निर्दे॒वो दे॒वाँ२ऽआ च॑ वक्षत्॥६२॥

दे॒व॒हूरिति॑ देव॒ऽहूः। य॒ज्ञः। आ। च॒। व॒क्ष॒त्। सु॒म्न॒हूरिति॑ सुम्न॒ऽहूः। य॒ज्ञः। आ। च॒। व॒क्ष॒त्। यक्ष॑त्। अ॒ग्निः। दे॒वः। दे॒वान्। आ। च॒। व॒क्ष॒त् ॥६२ ॥

Mantra without Swara
देवहूर्यज्ञऽआ च वक्षत्सुम्नहूर्यज्ञ आ च वक्षत् । यक्षदग्निर्देवो देवाँऽआ च वक्षत् ॥

देवहूरिति देवऽहूः। यज्ञः। आ। च। वक्षत्। सुम्नहूरिति सुम्नऽहूः। यज्ञः। आ। च। वक्षत्। यक्षत्। अग्निः। देवः। देवान्। आ। च। वक्षत्॥६२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, जो परमेश्‍वर (देवहू:) विद्वज्जनांना बोलविणारा (त्यांना प्रेरणा देऊन त्यांच्या मुखांतून सदुपदेश व सत्‌ ज्ञान सांगणारा) आहे, जो (यज्ञ:) पूजनीय आहे, तो आम्हा सर्वांना (विद्वानांहून इतर जनांना उपासकांना) (आ, वक्षत्‌) देखील उपदेश करो (विद्वानांप्रमाणे आम्हालाही प्रेरणा देवो) (च) आणि आम्हाला असत्यापासून सोडविणारा होवो. तसेच तो ईश्‍वर (सुम्नहू:) सुख पाठविणारा असून (यज्ञ:) पूजनीय आहे, तो आम्हाला सुख व आनंद (आ वक्षत्‌) देवो (च) आणि आमच्या दुखांचा विनाश करो. तो (अग्नि:) स्वत: प्रकाशवान (गुणवान) (देव:) सर्व सुखांचा दाता परमेश्‍वर आम्हा (उपासकांना) (देवान्‌) उत्तम गुण व उत्तम उपभोग (यक्षत्‌) देवो (च) आणि (आ, वक्षत्‌) उत्तम पदार्थ आम्हाला देवो म्हणजे कार्यान्तराने आम्हाला प्राप्त करून देवो (परमेश्‍वर निराकार असल्यामुळे तो प्रत्यक्ष देत नाही. त्याने वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ देऊन त्याद्वारे आम्हास सुखी करविल आशा आहे ॥62॥
Essence
भावार्थ - उत्तमशास्त्रज्ञाता विद्वान लोक ज्या परमेश्‍वराची उपासना करतात आणि जो सुखस्वरूप असून मंगलदायक कर्म (करण्यासाठी प्रेरणा) देणारा आहे, मनुष्यांनी समाधीयोगाद्वारे त्या परमेश्‍वराची उपासना करावी ॥62॥
Subject
ईश्‍वर कसा आहे, पुढील मंत्रात हा विषय –