Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 60

99 Mantra
17/60
Devata- आदित्यो देवता Rishi- अप्रतिरथ ऋषिः Chhand- निचृदार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
उ॒क्षा स॑मु॒द्रोऽअ॑रु॒णः सु॑प॒र्णः पूर्व॑स्य॒ योनिं॑ पि॒तुरावि॑वेश। मध्ये॑ दि॒वो निहि॑तः॒ पृश्नि॒रश्मा॒ वि च॑क्रमे॒ रज॑सस्पा॒त्यन्तौ॑॥६०॥

उ॒क्षा। स॒मु॒द्रः। अ॒रु॒णः। सु॒प॒र्ण इति॑ सुऽप॒र्णः। पूर्व॑स्य। योनि॑म्। पि॒तुः। आ। वि॒वे॒श॒। मध्ये॑। दि॒वः। निहि॑त॒ इति॒ निऽहि॑तः। पृश्निः॑। अश्मा॑। वि। च॒क्र॒मे॒। रज॑सः। पा॒ति॒। अन्तौ॑ ॥६० ॥

Mantra without Swara
उक्षा समुद्रोऽअरुणः सुपर्णः पूर्वस्य योनिम्पितुराविवेश । मध्ये दिवो निहितः पृश्निरश्मा विचक्रमे रजसस्पात्यन्तौ ॥

उक्षा। समुद्रः। अरुणः। सुपर्ण इति सुऽपर्णः। पूर्वस्य। योनिम्। पितुः। आ। विवेश। मध्ये। दिवः। निहित इति निऽहितः। पृश्निः। अश्मा। वि। चक्रमे। रजसः। पाति। अन्तौ॥६०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, (तुम्ही जाणून घ्या की) परमेश्‍वराने (दिव:) या प्रकाशलोकांच्या (मध्ये) मधे (निहित:) स्थापित केलेला (हा सूर्य आहे, की जो) (उद्या) वृष्ठी-जलाद्वारे पृथ्वीला सिंचित करतो, (समुद्र:) तो सूर्यच आकाशातून वृष्ठि-जलाद्वारे पृथ्वीला सिंचित करतो, (समुद्र:) तो सूर्यच आकाशातून वृष्टि-जल वार्षित करणारा आहे (समुद्र:=सम्यण्‌ द्रवन्ति आयो यस्त्रात्‌ स: = सूर्य:) तो (अरूण:) लाल रंगाचा सूर्य (सपूर्ण:) सर्वांचे पालन करणारा असून (पृश्‍नि:) अद्भुत रंग धारण करणारा तेजोरुप आहे. तोच (अश्‍मा) मेघाच्या आणि (रजस:) अनेक लोकांच्या (अन्नौ) बंधनाचे कारण आहे (सूर्यामुळे मेघ गती करतात आणि ग्रहादी एकमेकाच्या आकर्षणात राहतात) (विचनुये) सूर्य त्यांना अनेकप्रकारे फिरवितो आणि (पति) त्यांचे रक्षण करतो. तसेच सूर्य (पूर्वस्य) संपूर्ण (पितु:) या सूर्यमंडळाच्या तेजाच्या उत्पत्तीचे कारण जी विद्युत रुप अग्नी आहे, त्या (योनिम्‌) कारणरुप विद्युतेमधे (आ विवेश) प्रवेश करतो (विद्युतेचे कारण सूर्यतेज आहे) यामुळे सूर्य आणि मेघ यांच्यापासून चांगल्याप्रकारे लाभ घेतले पाहिजेत. ॥60॥
Essence
भावार्थ - माणसांनी परमेश्‍वराला अनेकश: धन्यवाद दिले पाहिजेत. कारण त्याने स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी आणि या जगाचे रक्षण करण्याकरिता सूर्यासारखे उदाहरण दाखविले आहे (सूर्याचे गुण, लाभ, अस्तित्व या सर्वांमुळे माणसांना कल्पना येते की अशा अतिअद्भुत सूर्याची उत्पत्ती करणारा तो परमेश्‍वर कसा असेल) तो परमेश्‍वर सर्वशक्तिमान आहे, यात आश्‍चर्य काय! ॥60॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय कथित आहे -