Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 58

99 Mantra
17/58
Devata- अग्निर्देवता Rishi- अप्रतिरथ ऋषिः Chhand- आर्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
सूर्य॑रश्मि॒र्हरि॑केशः पु॒रस्ता॑त् सवि॒ता ज्योति॒रुद॑याँ॒२ऽअज॑स्रम्। तस्य॑ पू॒षा प्र॑स॒वे या॑ति वि॒द्वान्त्स॒म्पश्य॒न् विश्वा॒ भुव॑नानि गो॒पाः॥५८॥

सूर्य॑रश्शि॒मरिति॒ सूर्य्य॑ऽरश्मिः। हरि॑केश॒ इति॒ हरि॑ऽकेशः। पु॒रस्ता॑त्। स॒वि॒ता। ज्योतिः॑। उत्। अ॒या॒न्। अज॑स्रम्। तस्य॑। पू॒षा। प्र॒स॒व इति॑ प्रऽस॒वे। या॒ति॒। वि॒द्वान्। सं॒पश्य॒न्निति॑ स॒म्ऽपश्य॑न्। विश्वा॑। भुव॑नानि। गो॒पाः ॥५८ ॥

Mantra without Swara
सूर्यरश्मिर्हरिकेशः पुरस्तात्सविता ज्योतिरुदयाँऽअजस्रम् । तस्य पूषा प्रसवे याति विद्वान्त्सम्पश्यन्विश्वा भुवनानि गोपाः ॥

सूर्यरश्शिमरिति सूर्य्यऽरश्मिः। हरिकेश इति हरिऽकेशः। पुरस्तात्। सविता। ज्योतिः। उत्। अयान्। अजस्रम्। तस्य। पूषा। प्रसव इति प्रऽसवे। याति। विद्वान्। संपश्यन्निति सम्ऽपश्यन्। विश्वा। भुवनानि। गोपाः॥५८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, हा (सविता) सूर्य (पुरस्तात्‌) पहिल्यापासून (ज्योति:) सर्वांना प्रकाश देत आहे. (या प्रकाशातील) (हरिकेश:) हिरव्या रंगाची (सूय्यरश्‍मि:) जी सूर्यकीरण आहे, ती या (प्रसवे) उत्पन्न जगात (अजस्रम्‌) निरंतर व भरपूर (पूजा पुष्टी वा शक्ती देणारी आहे. (विद्वान्‌) कोणी विद्वान वैज्ञानिक (संपश्‍यन्‌) त्या कीरणाच्या वैशिष्ट्याला व गुणांना चांगल्या रीतीने समजून (त्याविषयी संशोधन करून वा अधिक ज्ञान मिळवून) त्याचे यथार्थ उपयोग (यति) जाणून घेतो. (तस्य) त्या सूर्यापासून (गोपा:) जगाचे रक्षण करणारे पृथ्वी आदी लोक (प्रकाश घेतात) व इतर तारागण (विश्‍वा) भुवनानि) समस्त लोक-लोकांतरांना (उद्यान्‌) प्रकाशित करतात. असे हे सूर्यमंडळ अतिशय प्रकाशमान आहे, हे तुम्ही नीट जाणून घ्या. ॥58॥
Essence
भावार्थ - हा जो सूर्यलोक आहे, त्याच्या प्रकाशात पांढऱ्या रंगाची हिरव्या रंगाची व इतर रंगी-बेरंगी किरणे आहेत. ती किरणें सर्व लोकांची रक्षा करतात. या किरणांद्वारेच सर्वांचे रक्षण होत आहे, हे तुम्ही यथार्थतेने समजून घ्या. ॥58॥
Subject
पुढील मंत्रात सूर्य लोकाच्या स्वरूपाविषयी कथन केले आहे –