Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 57

99 Mantra
17/57
Devata- यज्ञो देवता Rishi- अप्रतिरथ ऋषिः Chhand- निचृदार्षी बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
वी॒तꣳ ह॒विः श॑मि॒तꣳ श॑मि॒ता य॒जध्यै॑ तु॒रीयो॑ य॒ज्ञो यत्र॑ ह॒व्यमेति॑। ततो॑ वा॒काऽआ॒शिषो॑ नो जुषन्ताम्॥५७॥

वी॒तम्। ह॒विः। श॒मि॒तम्। श॒मि॒ता। य॒जध्यै॑। तु॒रीयः॑। य॒ज्ञः। यत्र॑। ह॒व्यम्। एति॑। ततः॑। वा॒काः। आ॒शिष॒ इत्या॒ऽऽशिषः॑। नः॒। जु॒ष॒न्ता॒म् ॥५७ ॥

Mantra without Swara
वीतँ हविः शमितँ शमिता यजध्यै तुरीयो यज्ञो यत्र हव्यमेति । ततो वाका आशिषो नो जुषन्ताम् ॥

वीतम्। हविः। शमितम्। शमिता। यजध्यै। तुरीयः। यज्ञः। यत्र। हव्यम्। एति। ततः। वाकाः। आशिष इत्याऽऽशिषः। नः। जुषन्ताम्॥५७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, (शमिता) शांती आदी गुणांनी शोभित हा गृहाश्रमी (यजध्यै) यज्ञ करण्यासाठी (वीतम्‌) सर्वत्र गमनशील (चारही दिशांत प्रस्तृत होणारे) आणि (शमितम्‌) दुर्गुणांची शांती करणारे (हवि:) होमासाठी उपयोगी असे (पुष्टिकारक, सुगंधित) पदार्थ अग्नीमधे टाकतो. हा गृहाश्रमी (तुरीय:) चवथा (यज्ञ:) आवश्‍यक यज्ञ करण्यासाठी (यत्र) जेथे (हव्यम्‌) होमा करिता उपयोगी पदार्थ प्राप्त होतात, तेथे (एति) जातो (वन, उपवन आदींना जाऊन गृहाश्रमी यज्ञोपयोगी सामग्री एकत्रित करतो) (तत:) त्यानंतर (वाका:) (इच्छित वा ) म्हटला जाणाऱ्या ज्या (आशिष:) इच्छा वा कामना आहेत, त्या (न:) आमच्या कार्यमा (जुषन्ताम्‌) ग्रहणमी पूर्ण करोत, अशी तुम्ही इच्छा करा (गृहाश्रमी मनुष्य यज्ञ करून आवश्‍यक कामनांची पूर्ती करतो. त्या कामना आम्ही देखील कराव्यात त्याच्याप्रमाणे यज्ञ करून आपली इच्छासिद्धी करावी. ॥57॥
Essence
भावार्थ - अग्रिहोम आदी यत्रात चार पदार्थ असतात. (1) सुवासिक, (2) पुष्टिकारक, (3) मिष्ट (गोठ) आणि (4) रोगनाशक व हवनीय पदार्थ त्या पदार्थांचे सोधन करून (स्वच्छ व शुद्ध करून) यज्ञ करणारा होता चेदी, अग्नी, समिधा आदी (एकत्रित करतो) यथाविधी हवन केल्याने होमात टाकलेले पदार्थ आकाशात जाऊन, तेथून पवन वा जल यांच्याद्वारे पुन्हा पृथ्वीवर येऊन इच्छापूर्ती करणारे होतात. मनुष्यानी हे सत्य अवश्‍य जाणून घ्यावे ॥57॥
Subject
पुन्हा तोच विषय -