Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 56

99 Mantra
17/56
Devata- अग्निर्देवता Rishi- अप्रतिरथ ऋषिः Chhand- विराडार्षी पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
दैव्या॑य ध॒र्त्रे जोष्ट्रे॑ देव॒श्रीः श्रीम॑नाः श॒तप॑याः। प॒रि॒गृह्य॑ दे॒वा य॒ज्ञमा॑यन् दे॒वा दे॒वेभ्यो॑ऽअध्व॒र्यन्तो॑ऽअस्थुः॥५६॥

दैव्या॑य। ध॒र्त्रे। जोष्ट्रे॑। दे॒व॒श्रीरिति॑ देव॒ऽश्रीः। श्रीम॑ना॒ इति॒ श्रीऽम॑नाः। श॒तप॑या॒ इति॑ श॒तऽप॑याः। प॒रि॒गृह्येति॑ परि॒ऽगृह्य॑। दे॒वाः। य॒ज्ञम्। आ॒य॒न्। दे॒वाः। दे॒वेभ्यः॑। अ॒ध्व॒र्यन्तः॑। अ॒स्थुः॒ ॥५६ ॥

Mantra without Swara
दैव्याय धर्त्रे जोष्ट्रे देवश्रीः श्रीमनाः शतपयाः । परिगृह्य देवा यज्ञमायन्देवा देवेभ्योऽअध्वर्यन्तो अस्थुः ॥

दैव्याय। धर्त्रे। जोष्ट्रे। देवश्रीरिति देवऽश्रीः। श्रीमना इति श्रीऽमनाः। शतपया इति शतऽपयाः। परिगृह्येति परिऽगृह्य। देवाः। यज्ञम्। आयन्। देवाः। देवेभ्यः। अध्वर्यन्तः। अस्थुः॥५६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, ज्याप्रमाणे (अध्वय्यन्त:) यज्ञ करण्याची कामना करणारे (देवा:) विद्या देणारे विद्वान लोक (देवेभ्य:) इतर विद्वानांच्या प्रसन्नतेकरिता गृहाश्रमात यज्ञादी क्रिया करण्यात (अस्तउ) नियमाप्रमाणे वागतात (नेहमी व सातत्याने यज्ञ करतात) (तसे तुम्ही देखील करा) तसेच (दैव्याय) सद्गणांविषयी ज्याला चाड आहे, जो (धर्त्रे) धारणशील, धैर्यवान असून (जोष्ट्रे) प्रीतीयुक्त स्वभाव असणारा आहे, त्या होता (प्रमाणे तुम्हीही यज्ञ करा) याशिवाय (देवश्री:) विद्यारूप लक्ष्मी ज्याच्याजवळ आहे, (श्रीमना:) जो (देवश्री:) विद्यारुप लक्ष्मी ज्याच्याजवळ आहे, (श्रीमना:) जो लक्ष्मी (धन-संपदा) प्राप्त करण्यासाठी उत्सुक आहे आणि (शतपया:) ज्याच्याजवळ दूध आदी शेकडो पुष्टिकारक पदार्थ आहेत, त्या यजमानाप्रमाणे (देवा:) विद्या दान करण्याची कामना करणारे तुम्ही लोक विद्या-ज्ञान (परिगृह्य) ग्रहण करा आणि (यज्ञम्‌) सेवनीय गृहाश्रमात अग्निहोत्राला (आयन्‌) प्राप्त व्हा (गृहाश्रमाचे कर्तव्य आणि यज्ञकर्म अवश्‍य करीत जा) ॥56॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी सदैव धनप्राप्तीसाठी उद्यम-उद्योग केला पाहिजे. विद्वान लोक (हुशार व प्रामाणिक व्यापारी) ज्याप्रमाणे धन प्राप्त करतात, त्याच रीतीने अन्य जनांनीदेखील (सत्य व न्याय्य मार्गाने परिश्रम, पुरुषार्थाद्वारे धनप्राप्ती केली पाहिजे ॥56॥
Subject
आता यज्ञ कशाप्रकारे करावा, पुढील मंत्रात हा विषय-