Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 51

99 Mantra
17/51
Devata- इन्द्रो देवता Rishi- अप्रतिरथ ऋषिः Chhand- आर्ष्यनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
इन्द्रे॒मं प्र॑त॒रां न॑य सजा॒ताना॑मसद्व॒शी। समे॑नं॒ वर्चसा सृज दे॒वानां॑ भाग॒दाऽअ॑सत्॥५१॥

इन्द्रः॑। इ॒मम्। प्र॒त॒रामिति॑ प्रऽत॒राम्। न॒य॒। स॒जा॒ताना॒मिति॑ सऽजा॒ताना॑म्। अ॒स॒त्। व॒शी। सम्। ए॒न॒म्। वर्च॑सा। सृ॒ज॒। दे॒वाना॑म्। भा॒ग॒दा इति॑ भाग॒ऽदाः। अ॒स॒त् ॥५१ ॥

Mantra without Swara
इन्द्रेमम्प्रतरान्नय सजातानामसद्वशी । समेनँवर्चसा सृज देवानाम्भागदाऽअसत् ॥

इन्द्रः। इमम्। प्रतरामिति प्रऽतराम्। नय। सजातानामिति सऽजातानाम्। असत्। वशी। सम्। एनम्। वर्चसा। सृज। देवानाम्। भागदा इति भागऽदाः। असत्॥५१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (इन्द्र) सुखी व संतुष्ट सेनापती, (सजातानाम्‌) समान वय असलेले (तुमच्या सेनेतील सर्व तरूण) (देवानाम्‌) कुशल कलावान सैनिकांपैकी (इमय्‌) विजयी होऊन परतलेला हा जो वीरवर युवक सैनिक आहे, (प्रतराम्‌) शत्रुपक्षाला परिजित करण्याची त्याची जी रणनीती आहे, ती रणनीती तू (नय) प्राप्त कर (शत्रूला पराजित करण्याची युद्धकला व नीती शिकून घे – या सैनिकांनी कसे व काय पराक्रम केला, त्याची नोंद घे) की ज्यामुळे हा (वशी) जितेंद्रिय (असत्‌) होईल (शत्रू विजयापेक्षा इंद्रियजय अधिक कठीण आहे) तसेच (एनम्‌) वा वीराला (वर्चसा) ज्ञान, प्रशिक्षण आदीद्वारा (सं, सृज) अधिक संपन्न कर. यामुळे हा वीर (भागदा:) सर्वांना यथोचित भाग देणारा (आपले ज्ञान, युद्धशास्त्र दुसऱ्या सैनिकांना देणारा) (असत्‌) होईल. ॥51॥
Essence
भावार्थ - सेवक वा कर्मचारी या युद्धानंतर शत्रुपक्षातील जे पदार्थ मिळतील, ते सर्व पदार्थ (हत्यारे, रथ, प्राणी मिळालेली धन-संपदा आदी) एकट्या राजानेच घेऊ नये, तर योद्धा विजयी वीरांना त्यापैकी सोळावा भाग त्यांना देऊन त्यांचा गौरव करावा. तसेच कर्मचारी, सैनिक वा सेवकजन यांचा युद्धानंतर शत्रूंचे जे पदार्थ मिळतील, त्यातील सोळावा भाग राजाला द्यावा. सभापती (राजा) आदी सैन्याधिकारी जर जितेंद्रिय असतील, तर त्यांचा कधीही पराजय होणार नाही. जर सभापती (राजा) आपले हित व्हावे, असे इच्छीत असेल, तर त्याने लढणाऱ्या सैनिकांनी वा सेवकांनी मिळवून आणलेल्या शत्रूपक्षातील (धन-संपत्ती, वाहने, आदी) पदार्थातील सैनिकांना देय असलेला सोळावा भाग स्वत: ठेवून घेऊ नये. ॥51॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय-