Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 5

99 Mantra
17/5
Devata- अग्निर्देवता Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- भुरिगार्षी गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
हि॒मस्य॑ त्वा ज॒रायु॒णाग्ने॒ परि॑व्ययामसि। पा॒व॒कोऽअ॒स्मभ्य॑ꣳ शि॒वो भ॑व॥५॥

हि॒मस्य॑। त्वा॒। ज॒रायु॑णा। अग्ने॑। परि॑। व्य॒या॒म॒सि॒। पा॒व॒कः। अ॒स्मभ्य॑म्। शि॒वः। भ॒व॒ ॥५ ॥

Mantra without Swara
हिमस्य त्वा जरायुणाग्ने परिव्ययामसि । पावकोऽअस्मभ्यँ शिवो भव ॥

हिमस्य। त्वा। जरायुणा। अग्ने। परि। व्ययामसि। पावकः। अस्मभ्यम्। शिवः। भव॥५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने अग्नीप्रमाणे तेजस्वी सभापती महोदय, ज्याप्रमाणे आम्ही (प्रजाजन) (हिमस्य) थंडी (जरायुणा) दूर करणाऱ्या वस्त्राद्वारे वा अग्नीद्वारे (स्वत:ला झाकून घेतो अथवा पांघरूणाने थंडी दूर सारतो) त दूत (त्वा) आम्ही आपणास पांघरूणाप्रमाणे (परि व्ययामसि) सर्वप्रकारे रक्षक मानतो. त्यामुळे आपण (पावक:) पवित्रस्वरूप असल्यामुळे (अस्त्रभ्यम्‌) आम्हा प्रजाजनांसाठी (शिव:) मंगलकारी (भव) व्हा, ही प्रार्थना ॥5॥
Essence
भावार्थ - हे सभापती, ज्याप्रमाणे आग अथवा वस्त्र थंडीने त्रस्त अशा प्राण्याला थंडीपासून वाचवते आणि आनंदित करते, तद्वत आपल्या आश्रयाखाली येऊन आम्हा (प्रजाजनांचे) दु:ख दूर व्हावेत आणि आम्हास सर्व प्रकारे सुख मिळावे, (अशी आमची कामना आहे) ॥5॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय (सभापतीची कर्तव्ये) सांगितला आहे –